ई-20 पेट्रोलमुळे वाहनाचे मायलेज घटतंय, सी व्होटरचा धक्कादायक सर्व्हे, एनडीएच्या 52.5/समर्थकांचा विरोध
इथेनॉलचा आग्रह साखर उद्योजकांच्या भल्यासाठीच केला जात आहे. पूर्वी काँग्रेसी भावंडं शुगर लॉबी प्रभावित होती. तेच सत्ताधीश. आता ही काँग्रेसी भावंडं भाजपात डेरेदाखल झाली आहेत
(विजयकुमार पिसे)
नवी दिल्ली : ई-20 ची सध्या भारतात जोरात चर्चा सुरू असून विशेषत: वाहनधारकांनी मोठी धास्ती घेतली आहे. मात्र वाहन उत्पादक कंपन्या चूप आहेत. तर एकीकडे सी व्होटरचा धक्कादायक सर्व्हे समोर आला आहे. केंद्रातील एनडीए सरकारच्या (इथेनॉल मिश्रित) ई-20 च्या निर्णयाला 52.5% समर्थकांनी विरोध प्रकट केला आहे. दरम्यान न्यायालयाचेही निरीक्षण ई-20 बद्दल अस्वस्थ करणारे आहे. इथेनॉलमुळे वाहनाचं मायलेज घटतेय ही बाब चिंताजनक आहे.
केंद्र सरकार ई-20 पेट्रोलचा वापर वाढवण्यासाठी आग्रही असताना देशातील जनता मात्र याविरोधात जाताना दिसत आहे. विशेष म्हणजे भाजपसह मित्रपक्षांचे मतदारही इथेनॉल मिश्रित पेट्रोलचा वापर करण्याच्या विरोधात गेल्याचे अधोरेखित झाले आहे. पेट्रोलमध्ये 20 टक्के इथेनॉल मिसळण्यात आलेलं आहे. (जे पूर्वी 10टक्के होतं) यामुळे खनिज तेलाची आयात कमी होईल, प्रदूषण घटेल आणि ऊस उत्पादक शेतकर्यांना फायदा होईल, असा सरकारचा दावा आहे.
एकीकडे सरकार इथेनॉल मिश्रित पेट्रोल विक्री वाढवण्याच्या प्रयत्नात असताना दुसरीकडे केंद्र सरकारचे समर्थक या निर्णयाच्या विरोधात जात आहेत. इथेनॉलचा आग्रह साखर उद्योजकांच्या भल्यासाठीच केला जात आहे. महाराष्ट्रातील राजकारण आणि सत्ताकारण नेहमीच शुगर लॉबी केंद्रित होती/असते/आहे. पूर्वी गांधी काँग्रेस असो पवार काँग्रेस ही भावंडं शुगर लॉबी प्रभावित होती. त्यांनीच अनेक वर्षं महाराष्ट्राची सत्तासूत्रं सांभाळली. आता ही काँग्रेसी भावंडं (शुगर लॉबी)भाजपात डेरेदाखल झाली आहेत. त्यांचा प्रभाव सरकारवर दिसतो. त्यामुळे इथेनॉल मिश्रणाचा आग्रह सरकारकडून केला जात असल्याचा एक समज *(नॅरेटिव्ह) पसरला आहे.
यासंदर्भात सी व्होटरनं नुकताच सर्वे केला. तेव्हा ई-20 पेट्रोलमुळे 52.5 टक्के समर्थन विरोधात गेल्याचे स्पष्ट झाले आहे. या सर्व्हेनुसार निम्म्याहून अधिक लोकांना ई-20 पेट्रोलमुळे वाहनाचे मायलेज घटतेय, शिवाय इंजिनमध्येही बिघाड होण्याची भीती आहे. देशात केवळ 18.1 टक्के वाहनधारकांनी ई-20 चे समर्थन केले आहे. तर 29.5 टक्के वाहनधारक तटस्थ आहेत. हे खरं असलं तरी भविष्यात इथेनॉलचा वाढता वापर अपरिहार्य ठरणार आहे.
What's Your Reaction?