नॉर्थकोटचे नाव इतिहास जमा, सुरेशराव केतकर तांत्रिक विद्यालय, सोलापूर असे नामकरण

समर्पित जीवनाचा यथोचित गौरव! सुरेशराव केतकर संघाचे सहसरकार्यवाह, सोलापूर जिल्हा आणि विभागाचे पूर्व प्रचारक, सोलापूर भागात अनेक वर्ष संघ प्रचारक म्हणून कार्यरत, वयाच्या 84 व्या वर्षी 2016 मध्ये लातूर येथे निवर्तले

Nov 6, 2026 - 23:35
 0  260
नॉर्थकोटचे नाव इतिहास जमा, सुरेशराव केतकर तांत्रिक विद्यालय, सोलापूर असे नामकरण

(विजयकुमार पिसे)
मुंबई : सोलापुरातील ब्रिटिशकालिन (1886) मध्ये गव्हर्नमेंट हायस्कूल म्हणून स्थापन झालेली आणि पुढे नॉर्थकोट टेक्निकल हायस्कूल (तांत्रिक प्रशाला) नावाने प्रचलित प्रशालेचे आता नामकरण झाले असून यापुढे सुरेशराव केतकर तांत्रिक विद्यालय, सोलापूर या नावाने ओळखले जाईल आहे. (ब्रिटिशकालिन परकीयांच्या खुणा पुसून टाकल्याच पाहिजेत.) सुरेशराव केतकर रा.स्व. संघाचे सहसरकार्यवाह, सोलापूर जिल्हा आणि विभागाचे पूर्व प्रचारक होते. या काळात सोलापूर विभागात अनेक वर्ष संघ प्रचारक म्हणून कार्यरत होते. सुरेशराव केतकर तांत्रिक विद्यालय, सोलापूर नामकरणाचा निर्णय राज्याचे कौशल्य रोजगार नाविन्यता व उद्योजकता मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून नामकरणाचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. 
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक स्व. सुरेशराव केतकर यांनी आपले संपूर्ण जीवन राष्ट्रकार्य आणि समाजसेवेसाठी समर्पित केले. सोलापूर जिल्हा प्रचारक ते अखिल भारतीय सहसरकार्यवाह असा त्यांचा प्रेरणादायी प्रवास आहे. या प्रवासात त्यांनी संघटन विस्तार, कार्यकर्ता घडविणे आणि समाज जीवनाच्या विविध क्षेत्रांत त्यांचे मोलाचे योगदान राहिले आहे. आता यापुढे सुरेशराव केतकर तांत्रिक विद्यालय या नावाने ओळखले जाईल. हे केवळ नामकरण नसून, भावी पिढीसमोर समर्पण, सेवाभाव, शिस्त आणि राष्ट्रनिष्ठेचा आदर्श अशी प्रेरणादायी घटना आहे.
देशासाठी, समाजासाठी समर्पित प्रचारकांच्या कार्याचा हा सन्मान आहे. त्यांच्या विचारांचा आणि कार्याचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविणार्‍या उपक्रमाचे स्वागत आहे.संघशताब्दीपूर्तीच्या पृष्ठभूमीवर राज्याचे किमान कौशल्य मंत्री तथा संघ स्वयंसेवक  मंगलप्रभात लोढा यांचे सोलापूरवासीना ही दिवाळी भेट दिली. याबद्दल सोलापूरकरांच्या वतीने त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन. शतश: धन्यवाद.
 सुरेशराव केतकर यांचा जन्म: 28 सप्टेंबर 1934 पुणे येथे झाला. बी.एससी., बी.एड. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नोकरी सोडून संघाचे पूर्णवेळ प्रचारक बनले.  सोलापूर जिल्हा व विभाग प्रचारक, महाराष्ट्र प्रांत शारीरिक शिक्षण प्रमुख,  अखिल भारतीय शारीरिक शिक्षण प्रमुख, 2002 मध्ये अखिल भारतीय प्रचारक प्रमुख, 2002 मध्ये अखिल भारतीय सहसरकार्यवाह अशा जबाबदार्‍या पार पाडल्या. याशिवाय  इतर संस्थांशी आणि उभारणीतही त्यांचे योगदान राहिले आहे. संस्कार भारती, क्रीडा भारतीचे प्रारंभापासून संरक्षक होते. तसेच भारतीय शिक्षण प्रसारक संस्था (अंबाजोगाई), विवेकानंद वैद्यकीय प्रतिष्ठान (लातूर) आणि जनता सहकारी बँक (पुणे) या संस्थांचेही मार्गदर्शक होते. आजही या सर्व संस्थांचे त्या त्या क्षेत्रात मोठे योगदान राहिले आहे. 16 जुलै 2016 रोजी वयाच्या 84 व्या वर्षी लातूर येथील विवेकानंद रुग्णालयात दीर्घ आजारामुळे त्यांचे निधन झाले.  

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow