महाराष्ट्रात जिहादी अतिक्रमणांवर 'देवा'चा बुलडोझर

देवाभाऊंचे गृह खाते सांगत नाही,काम तमाम करते, कुणालाही अतापता लागू देत नाही. पण अतिक्रमण हटाव मोहीम फत्ते; म्हणून महाराष्ट्राला हाच 'देव' (फडणवीस) हवाय!

Sep 10, 2026 - 12:09
 0  78
महाराष्ट्रात जिहादी अतिक्रमणांवर 'देवा'चा बुलडोझर

(विजयकुमार पिसे)
   मुंबई : देशात बुलडोझर  योगीबाबाची खूप चर्चा होते. आपल्याकडे असे का होत नाही, असा अनेकांचा अस्वस्थ करणार प्रश्‍न. पण इथेही आहे देवाभाऊचा बुलडोझर.  
  महाराष्ट्रात जिहादी अतिक्रमणांवर हा बुलडोझर चालतो, काम तमाम करतो. मात्र देवाभाऊंचे गृह खाते सांगत नाही. करून दाखवते. पण माध्यमं, मिडिया आणि चॅनलवाले फोकस करत नाहीत, हे ही तितकंच खरं. उलट मिडियाचाच सवाल असतोय, 'गृहखातं' करतंय काय? महाराष्ट्रवासीयांनो मिळालं उत्तर?
   जिहादींचेे अतिक्रमण हटाव मोहीम फत्ते होते, कुणालाही त्याचा अतापता लागू देत नाही. म्हणून आम्हा महाराष्ट्राला हाच 'देव' (फडणवीस) हवाय!
    दोन दिवसांपूर्वी पिंपरी चिंचवड भागातील काळेवाडी येथे अतिक्रमणावर बुलडोझर चालला. मध्यरात्री ते पहाटेपर्यंत काळेवाडी परिसरातील राजवाडे नगर येथे एका वादग्रस्त आणि अनधिकृत धार्मिक बांधकामावर (चर्च) बुलडोझर चालवून मोहीम फत्ते झाली. म्हणजे औषधाला देखील हे जिहादी चर्च जागेवर शिल्लक राहिले नाही. 


 पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासनाकडून अनधिकृत धार्मिक स्थळाचे अतिक्रमण निष्कासन करण्यात आले. या कारवाईत 7,400 चौ.फू. क्षेत्रफळातील बांधकाम पाडण्यात आले. यावेळी 11 पोकलेन, 5 जेसीबी, 25 मजूर, 12 अग्निशमन बंब आणि एक रुग्णवाहिका तैनात होती. 10 कार्यकारी अभियंते, 28 उप/कनिष्ठ अभियंते आणि कडेकोट पोलीस बंदोबस्त व महाराष्ट्र सुरक्षा दलाचे 55 जवान याप्रसंगी उपस्थित होते. या कारवाई दरम्यान चर्चच्या सदस्यांनी आक्षेप घेत न्यायालयात सुनावणी सुरू आहे व स्थगिती आदेश असल्याचा दावा केला होता.
    *दुसरी घटना सातारा जिल्ह्याच्या क्षेत्र माहुली येथील. रस्त्यालगतच्या ग्रीन झोनमधील अनधिकृत प्रार्थनास्थळाचे बांधकाम प्रशासनाने बुलडोझर लावून पूर्णपणे जमीनदोस्त केले. स्थानिक नागरिकांच्या संघर्षाला देवाभाऊनी साद घातली. त्यांच्या तक्रारी देखील होत्या. ग्रीन झोनच्या जागेवर 2016 मध्ये एका प्रार्थनास्थळाचे अनधिकृत बांधकाम झाले होते. त्याच्या वैधतेवर स्थानिकांनी आक्षेप घेत जिल्हाधिकार्‍यांकडे तक्रारी केल्या होत्या. मोर्चे व आंदोलनेही झाली. त्यांच्या तक्रारींची दखल घेत अखेर कारवाई झाली. 
   दरम्यान तेव्हा चौकशीत संबंधित बांधकाम अनधिकृत असल्याचे निष्पन्न झाले. शेवटी पहाटेच पोलीस बंदोबस्तात बुलडोझर फिरवण्यात आला. 
गेल्या महिन्यात नाशिकात सारडा सर्कल, पुणे कुदळवाडी, मीरा भाईंदर, बोपोडी, हदवाग नांदेड येथेही राज्याच्या गृहखात्याने  प्रशासनाकडून अनधिकृत अतिक्रमण निष्कासन मोहीम फत्ते करून जिहाद्यांचे कंबरडे मोडले आहे. या वार्ता बहुदा कुठे प्रसिध्द झाल्या नाहीत, वा चॅनल्सनी दाखवल्या नाहीत. म्हणून लक्ष्यवेध न्यूजचा हा वार्ता प्रपंच। 

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow