जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेत स्वामी विवेकानंद प्रशालेची दोन पदकांची कमाई
जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेत स्वामी विवेकानंद प्रशालेची दोन पदकांची कमाई

सोलापूर: सोलापूर शहर-जिल्हा ॲथलेटिक असोसिएशनच्या वतीने एस.आर.पी.एफ. ग्राऊंड, सोरेगाव येथे दि. 8 सप्टेंबर 2024 रोजी संपन्न झालेल्या जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेत एमआयडीसी परिसरातील स्वामी विवेकानंद प्रशालेने दोन पदके पटकावले. 16 वर्षाखालील मुलींच्या गटात भालाफेक क्रीडा प्रकारात कु.निशा लिंबोळे हिने सुवर्णपदक तर कु.भावना चाटला हिने रौप्य पदक पटकावले...
या घवघवीत यशाबद्दल नॅब संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष मा.प्रकाशजी यलगुलवार, उपाध्यक्ष अनुगीता पवार, जनरल सेक्रेटरी शशीभूषण यलगुलवार, मुख्याध्यापिका सीमा श्रीगोंदेकर यांनी यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छाही दिल्या...
या खेळाडूंना क्रीडाशिक्षक सुभाष माने, गणपती कोळी, खंडू शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले...
या खेळाडूंची पुणे येथे होणाऱ्या *राज्यस्तरीय मैदानी स्पर्धेसाठी* निवड झालेली आहे...
What's Your Reaction?






