Victory Parade : विराट कोहलीच होता खरा मास्टरमाईंड, माँ तुझे सलाम गाणं सर्व खेळाडूंनी गाण्यापूर्वीचा VIDEO व्हायरल
Virat Kohli Viral Video : टीम इंडियाच्या विजयी परेडनंतर खेळाडूंनी वानखेडे स्टेडियमवर प्रेक्षकांसोबत वंदे मातरमचे गायन केले. आता विराट कोहलीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये असा दावा करण्यात आलाय की विराटने वंदे मातरम गाण्याचा प्लॅन अगोदरच केला होता.

Virat Kohli Vande Mataram Singing Plan Video Viral : टी-२० विश्वचषक २०२४ चे विजेतेपद पटकावल्यानंतर बार्बाडोसमध्ये ४ दिवस अडकून टीम इंडिया भारतात परतली, तेव्हा त्याचे भव्य स्वागत करण्यात आले. संपूर्ण देशाने मिळून हा विश्वचषक विजय साजरा केला. यानंतर टीम इंडियाने मुंबईत विजयी परेडही काढली. वानखेडे स्टेडियमवर संपूर्ण टीम इंडियाचा गौरवही करण्यात आला. यावेळी टीम इंडियाच्या खेळाडूंनी वानखेडेवर प्रेक्षकांसोबत वंदे मातरमचे गायनही केले. यादरम्यान विराट कोहली पूर्ण उत्साहात वंदे मातरम गाताना दिसला. आता सोशल मीडियावर एक व्हिडीओ खूप वेगाने व्हायरल होत आहे, ज्यामध्ये असा दावा केला जात आहे की कोहलीने संघातील खेळाडूंसह प्रेक्षकांसह वंदे मातरम गाण्यासाठी आधीच तयारी केली होती.
नवीन व्हिडीओ आला समोर –
वानखेडे स्टेडियमच्या प्रेक्षकांसह टीम इंडियाने वंदे मातरम गाऊन विजयी परेडचा समारोप केला. यावेळी सर्व खेळाडू प्रेक्षकांसोबत वंदे मातरम गाताना दिसले. ज्यामध्ये विराट कोहली आणि हार्दिक पंड्या आघाडीवर दिसत होते. आता आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. ज्यामध्ये विराट कोहली वंदे मातरम गाण्यापूर्वी इतर खेळाडूंशी बोलताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये असा दावा केला जात आहे की, कोहली प्रेक्षकांसह वंदे मातरम गाण्याची तयारी करत होता.
विषेश म्हणजे स्टेडियममध्ये चाहत्यांना प्रवेश विनामूल्य होता. त्यामुळे विश्वविजेत्यावर प्रेमाचा वर्षाव करण्यासाठी मोठ्या संख्येने चाहते स्टेडियममध्ये जमले होते. भारतीय संघाचा ताफा ९ वाजण्याच्या सुमारास स्टेडियममध्ये दाखल झाला असला तरी वानखेडे स्टेडियम मात्र तीन वाजताच भरले होते. विजय परेडनंतर वानखेडे स्टेडियमवर मोटा जल्लोष करण्यात आला. यावेळी रोहित शर्माने आपले विचार मांडले. तसेच विराट कोहलीने सांगितले की विश्वचषक जिंकणे हे संघाचे संयुक्त ध्येय होते. त्याचवेळी आयपीएलमध्ये जाहीर टीकेचा सामना करणाऱ्या हार्दिक पंड्यावरही प्रेक्षकांनी प्रेमाचा वर्षाव केला.
What's Your Reaction?






