गुड न्यूज; १०रुपयात गारेगार बस : महापौर
१८ AC/इले.बस दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर धावणार, आज दुपारी 4 वा. शुभारंभ
सोलापूर: प्रधानमंत्री इलेक्ट्रिक बस सेवा योजनेअंतर्गत सोलापूर महानगरपालिकेला प्राप्त 20 इलेक्ट्रिक बसपैकी 18 बसेस आज दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर रस्यावर धावणार, ही गुड न्यूज महापौर विनायक कोंड्याल यांनी सोलापूरकरांना दिली.
शहरात ९ आणि ग्रामीण भागात ७ मार्गांवर १० रुपयात ही गारेगार (A/c) बस सेवा सुरू होणार आहे. वातानुकूलित बससेवेचे किमान तिकीट दर केवळ १० रुपये; सकाळी ६ ते दुपारी २ आणि दुपारी २ ते रात्री १० अशा दोन सत्रांत ही सेवा आहे. या सेवेमुळे सोलापूरकरांना सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत आधुनिक, आरामदायी आणि पर्यावरणपूरक सेवेची भर पडणार आहे.
महानगरपालिका परिवहन विभागातर्फे १८ बसचे नियोजन केले आले, दोन बसेस राखीव ठेवण्यात आलेले आहेत. प्रवाशांच्या सोयीसाठी दोन सत्रांमध्ये बससेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. पहिल्या सत्रात सकाळी ६ ते दुपारी २ वाजेपर्यंत, तर दुसऱ्या सत्रात दुपारी २ ते रात्री १० वाजेपर्यंत या बसेस उपलब्ध आहेत.
या बससेवेचे वैशिष्ट्य म्हणजे या वातानुकूलित (AC) असून प्रवाशांना आरामदायी प्रवासाचा अनुभव मिळणार आहे. विशेष म्हणजे, किमान तिकीट दर केवळ १० रुपये आहे.
शहरातील वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्याबरोबरच नागरिकांना सुरक्षित, आरामदायी आणि सुलभ सार्वजनिक वाहतूक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हा महत्त्वपूर्ण उपक्रम ठरेल, असे कोंड्याल म्हणाले.
What's Your Reaction?