56कोटींमुळे एमआयडीसीत पायाभूत सुविधा मिळणार: दायमा

सोलापूरच्या अक्कलकोट रोड व होटगी रोड एमआयडीसी औद्योगिक वसाहतींसाठी राज्य सरकारकडून ५६ कोटी रुपयांचा विशेष निधी मंजूर झाला आहे. या निधीतून रस्ते, पाणी, वीज व इतर पायाभूत सुविधा उभारल्या जाणार असून उद्योगांना चालना मिळणार असल्याची माहिती श्रीनिवास दायमा यांनी दिली.

Apr 28, 2026 - 01:07
Apr 28, 2026 - 01:11
 0  50
56कोटींमुळे एमआयडीसीत पायाभूत सुविधा मिळणार: दायमा

सोलापूर : शहरातील अक्कलकोट रोड आणि होटगी रोड औद्योगिक वसाहतींमध्ये विकासकामांसाठी राज्य सरकारकडून 56 कोटी रुपयांचा निधी विशेष बाब म्हणून मंजूर करण्यात आला आहे. यामुळे पायाभूत सुविधा निश्‍चितपणे मार्गी लागतील, असा विश्‍वास नगरसेवक तथा भाजप उपाध्यक्ष श्रीनिवास दायमा यांनी लक्ष्यवेध न्यूजशी संवाद साधताना व्यक्त केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आज सोलापूर दौर्‍याच्या पृष्ठभूमीवर श्री दायमा यांनी फडणवीस साहेबांचे आभार मानले. तसेच 56 कोटींचा विशेष निधी मिळाल्याबद्दल पालकमंत्री जयकुमार गोरे व आ. देवेंद्र कोठे यांचे अभिनंदन करून त्यांना धन्यवाद दिले.

एमआयडीसीत गेल्या अनेक वर्षांपासून मूलभूत सुविधांचा अभाव होता. त्यामुळे आजारी उद्योगांची भर पडत होती.आता 56 कोटींचा विशेष निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीमुळे औद्योगिक वसाहतींमध्ये रस्ते, पाणीपुरवठा, वीज आणि इतर आवश्यक पायाभूत सुविधा पूर्ण होतील. तसेच स्थानिक उद्योगांना चालना मिळून सोलापूरच्या औद्योगिक विकासाला गती मिळेल. मुख्यमंत्री फडणवीस यांनी विशेष बाब म्हणून उद्योजकांना भरावे लागणारे 14 कोटी रुपये वाचवले आहेत, आम्हा उद्योजकांना हा मोठा दिलासा आहे, असे दायमा म्हणाले.अक्कलकोट रोड औद्योगिक वसाहतीतील 35, होटगी रोड औद्योगिक वसाहतीमध्ये 9 रस्ते पूर्णत्वास लागतील. एमआयडीसीचा पूर्णत्वाने कायापालट होईल, उद्योग विकास वाढीचा वेगदेखील वाढणार आहेे.

मारवाडी समाजाला मनपात स्वीकृत नगरसेवक म्हणून संधी मिळाली, समाजाला याचा मनस्वी आनंद आहे. या ठिकाणी मोठ्या संख्येने राजस्थानी मारवाडी समाज आहे. तो नेहमीच भाजपा सोबत आहे, याची दखल मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतल्याबद्दल मारवाडी समाजाने त्यांचे आभार मानले आहेत. फडणवीस यांच्या सभेस उद्योजक, व्यापारी,कारखानदार व मारवाडी समाज बांधव बहुसंख्येने उपस्थित राहणार आहेत, असे श्रीनिवास दायमा म्हणाले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow