आ.देवेंद्र कोठे आरोग्य सेवेसाठी सजग, अतिरिक्त कार्डियाक रुग्णवाहिका, परिचारिकांचा ग्रेड पे प्रलंबित
विधानसभेत पुरवणी मागण्यांमध्ये उठवला आवाज; मनपा रुग्णालयात तज्ञ डॉक्टर, अंगणवाडी मदतनीसांचे गंभीर प्रश्न सोडवणार: मंत्री तटकरे, आबिटकर यांची ग्वाही
विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात आ.देवेंद्र कोठे यांनी आरोग्य विषयावर आपली सजगता दाखवत, सोलापूरसाठी अतिरिक्त कार्डियाक रुग्णवाहिका, परिचारिकांच्या ग्रेड पे प्रलंबित विषयावर आवाज उठवला. विशेष म्हणजे पुरवणी मागण्यांची वेळ संपलेली असताना आ.कोठे यांना मिळालेल्या संधीचे त्यांनी सोने केले. तसेच राज्याचे मंत्री आदिती तटकरे आणि प्रकाश आबिटकर यांनी मनपा रुग्णालयात तज्ञ डॉक्टर, अंगणवाडी मदतनीसांचे गंभीर प्रश्न सोडवण्याची ग्वाही दिली.
महानगरपालिकेतील तज्ञ डॉक्टरांच्या मानधन वाढीचा प्रस्ताव प्रलंबित आहे. त्यामुळे विशेष तज्ञ डॉक्टरांची मानधन वाढ न रोखता तत्काळ मानधन वाढ करण्याची मागणी केली. सोलापूर जिल्ह्यासाठी अतिरिक्त कार्डियाक रुग्णवाहिका मिळावी, याकडेे आ.कोठे यांनी लक्ष वेधले.पालिकेच्या आरोग्य विभागातील सार्वजनिक आरोग्य परिचारिकांच्या 4 हजार 300 रुपये ग्रेड पेचा ठराव मंजूर होऊनही तो अद्याप प्रलंबित आहे. अंगणवाडी सेविका, मुख्य सेविका व पर्यवेक्षिका पदासाठी संधी आहे. परंतु त्यांच्यावर अन्याय होत आहे, असे आ.कोठे म्हणाले. तेव्हा मंत्री अदिती तटकरे यांनी अंगणवाडी मदतनीस यांच्या पदोन्नतीबाबत सकारात्मक पावले उचलणार असल्याची ग्वाही दिली. आरोग्य मंत्री आबिटकर यांनीही सभागृहातील प्रश्न समजून त्या प्रश्नांची सोडवणूक करणार असल्याचे सांगितले. यावेळी आ.देवेंद्र कोठे यांनी तालिका सभापती समाधान आवताडे यांचेही आभार मानले.
What's Your Reaction?