हुश्श्य.... विमान 'उड्डणा'र बरं का!
'सोलापूर टू गोवा'साठी बुकींग सुरू, ही बातमी फुटली आणि काँग्रेसने आधीच हवेत विमान सोडून हुर्रे केली

(विजयकुमार पिसे)
सोलापूरचे बहुचर्चित विमान उड्डाण म्हणजे चेष्टेचा विषय. आणि काल काँग्रेसने हवेत विमान सोडून सरकारची हुर्रे केली. कारण विमान उडणार ही बातमी त्यानाच आधी कळाली. आणि इकडे उड्डाणासाठी सोलापूर -गोवा मार्गासाठी बुकिंग सुरू झाले.
विमानसेवा पुरवणाऱ्या फ्लाय ९१ने गोवा ते सोलापूर दरम्यान थेट उड्डाण सुरू करण्याची घोषणा केली आहे. या विमानाची तिकिटे फ्लाय९१च्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध आहेत. फ्लाय ९१ एक सुरक्षित, जलद आणि विश्वासार्ह प्रवासाचा पर्याय उपलब्ध करून देत आहे, यामुळे गोव्याच्या समृद्ध पर्यटनाला आणि सोलापूरच्या धार्मिक व औद्योगिक वैशिष्ट्यांना दोन्ही भागांतील प्रवाशांसाठी अधिक सुलभ आणि सहज करता आले आहे. सोलापूर कापड उद्योग आणि औद्योगिक विकासासाठी ओळखले जाते. तसेच धार्मिक दृष्टीने पंढरपूर, तुळजापूर, अक्कलकोट, ,गाणगापूर या तीर्थक्षेत्रांचे प्रवेशद्वार मानले जाते. त्यामुळे सोलापूर विमानसेवेचा लाभ होईल, असे फ्लाय९१चे व्यवस्थापकीय संचालक, मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज चाको यांनी सांगितले.
आ. कोठे यांनी मानले आभार
सोलापूरहून विमान सेवा सुरू होत असलेबद्दल शहर मध्य चे भाजप आ.देवेंद्र कोठे यांनी आनंद व्यक्त करून सरकारचे आभार मानले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, पालकमंत्री गोरे, तत्कालिन अध्यक्ष आ.कल्याणशेट्टी यांना धन्यवाद दिले आहे. विमान सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.
What's Your Reaction?






