इस्रोचे शास्त्रज्ञ डॉ.केतन रिकामे यांना पीएचडी
श्रीहरीकोटाच्या प्रक्षेपित उपग्रहात उपकरणाचे संशोधन

(विजयकुमार पिसे)
पुणे : पुणे पिंपरी येथील ज्ञानप्रबोधिनी विद्यालयाचा माजी विद्यार्थी डॉ. केतन भास्कर रिकामे यांना एस्ट्रोफिजिक्समध्ये पी.एच.डी. प्राप्त झाली आहे. डॉ.केतन, गतवर्षी 1 जानेवारी रोजी श्रीहरिकोटा इस्रोच्या अंतरिक्ष केंद्रातून उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण झाले, त्या टीमचा सदस्य होता.
डॉ. केतन रिकामे यांनी इन्स्ट्रुमेंटेशनमध्ये बंगलोर येथील रामण रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये संशोधन केले आहे. यामध्ये एक्सरे पोलरोमीटर हे उपकरण तयार केलेल्या टीममध्ये डॉ. केतन यांचा सहभाग होता. सदरचे उपकरण भारताचे श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतरिक्ष केंद्रातून 1 जानेवारी 2024 रोजी स.9.10 मि.नी प्रक्षेपित झालेल्या XPosat या भारतातील पहिल्या व जगातील दुसर्या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण झाले. या उपग्रहामध्ये एक्सरे पोलरोमीटर हे उपकरण बसविण्यात आले. या उपग्रहाच्या माध्यमातून अवकाशातील "ब्लॅक होल"चा अभ्यास करण्यात येत आहे. डॉ. केतन आणि त्यांच्या टीमने तयार केलेल्या या उपकरणातून एक्सरेच्या माध्यमातून येणारे संदेश ग्रहण करुन त्याचे संकलन केले जाते. त्यानुसार रामण रिसर्च इन्स्टिट्यूट, बंगलोर येथे पुढील संशोधन केले जाते.
डॉ. केतन यांनी "इंडियन इन्स्टीट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अॅन्ड रिसर्च पुणे" या संस्थेमधून बी.एस.,एम.एस. ही पदवीव्युत्तर पदवी प्राप्त केली. त्यानंतर पुणे येथील आयुका, Caltech University, कॅलिफोर्निया इ. ठिकाणी प्रकल्पावर काम केले आहे.तसेच गेली पाच वर्षे रामण रिसर्च इन्स्टिट्यूट, बंगलोर येथे डॉ. बिश्वजित पॉल व डॉ. व्ही. जितेश यांच्या मार्गदर्शनाखाली केतन रिकामे संशोधन करीत असून भारतीय अंतराळ संशोधन संस्था ISRO येथे प्रोजेक्ट करीत आहेत. या सर्व संशोधनाचा अगदी उपकरण तयार करणे, उपग्रहामध्ये बसवणे, अंतराळात पाठवणे, त्याचे संदेश मिळवणे व त्यावर संशोधन करणेसाठी डॉ.केतन यांना दि. 31 मे रोजी अग्रमानांकित अशा ख्राईस्ट युनिव्हर्सिटीकडून पीएच.डी. प्रदान करण्यात येणार आहे.या उपग्रहाची माहिती देण्यासाठी इन्स्टिट्यूटच्या वतीने डॉ. केतन रिकामे यांनी साऊथ आफ्रिका, इटली व भारतातील विविध ठिकाणी झालेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत सहभाग घेतला आहे.
डॉ.केतन रिकामे ज्ञानप्रबोधिनी नवनगर विद्यालय, निगडीचे माजी विद्यार्थी आहे. असून त्यांच्या मातोश्री विहिंपच्या मातृशक्ती प्रांत सहसंयोजिका सौ.शारदाताई रिकामे आणि पिंपरी येथील निसर्ग मित्र विभाग सावरकर मंडळाचे कार्याध्यक्ष भास्कर रिकामे यांचे सुपुत्र आहेत. विहिंप परिवाराच्या वतीने रिकामे परिवारावर अभिनंदन आणि कौतुकाचा वर्षाव होत आहे.
What's Your Reaction?






