लोकसेवा हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांची 25 वर्षांनी गळाभेट
एमआयडीसीमधील महालक्ष्मी हॉल येथे हा सोहळा, मा.मुख्याध्यापिका वैशाली जेरे :विद्यार्थ्यांच्या यशातच शाळेचे यश

सत्यसाई नगर भागातील लोकसेवा हायस्कूलच्या सन 2000 सालच्या माजी विद्यार्थ्यांची तब्बल 25 वर्षांनी गळाभेट झाली. स्नेहसंमेलनानिमित्त विद्यार्थी व विद्यार्थिनी एकत्र आले. त्यांनी आठवणींना उजाळा दिला. तसेच आपल्या गुरूजनांविषयी ऋण व्यक्त करताना गुरूजनांचे पाद्यपूजन केले. एमआयडीसीमधील महालक्ष्मी हॉल येथे हा ऋणानुबंध सोहळा पार पडला.
लोकसेवा हायस्कूलच्या 2000 सालच्या दहावी बॅचचे विद्यार्थी आज देशविदेशात मोठ्या पदावर कार्यरत असून काही जण उद्योजक झाले आहेत. तर काही विद्यार्थ्यांनी सामाजिक व राजकीय कार्याचा वसा घेतला आहे. या सर्व मित्रांना स्नेहमेळावानिमित्त पुन्हा एकदा आठवणींना उजाळा मिळाला.
प्रशालेच्या माजी मुख्याध्यापिका वैशाली जेरे तांबोळकर, टी.आर. खजूरकर, गुरूबाळा तावसे, सुधीर उपरे, धुरपे, माविनमर, अंगडी, एन. वाय.कांबळे, दिलीप दिंडोरे, पंडित चामशेट्टी, एस.एस. पाटील, ज्ञानेश्वर गुंजाळ, नागनाथ कुंभारे दीपक कोडमूर, शंकर चौगुले, रामचंद्र बागल, यू.एल. चव्हाण, एस.एम.धोत्रे, राजू खिलारे, नितीन खिलारे, राजू देवकर तसेच शिक्षिका शोभा ढंगे, शशिकला सालपे, रोजमेरी जेकब, एस.एम.शिंदे आणि छाया उपरे आदी शिक्षक शिक्षिका व 200 माजी विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.
प्रारंभी वैशाली जेरे यांनी आपल्या मनोगतातून सर्व उपस्थित विद्यार्थी आज वेगवेगळ्या क्षेत्रात यशाची शिखर गाठली आहेत. त्याबद्दल त्यांनी कौतुक केले. विद्यार्थ्यांनी आपापल्या क्षेत्रात यश मिळवून शाळेचे नाव उज्वल केले आहे. विद्यार्थ्यांच्या यशातच शाळेचे यश दबलेले असते, असे विचार व्यक्त केले. शशिकला सालपे म्हणाल्या की, विद्यार्थ्यांना भेटून आम्हास नवचैतन्य मिळाले. आम्हाला अभिमान आहे. तसेच यावेळी चौगुले, कोडमुर, उपरे, तावसे, चव्हाण, माविनमर या शिक्षकांनीही माजी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. तसेच विदेशात असलेले शरद बागल, ज्योती विजापुरे, प्रशांत तेल्लूर या माजी विद्यार्थ्यांनीही शुभेच्छा पाठविल्या होत्या. माजी विद्यार्थ्यांनी शाळेतील गप्पा गोष्टी, खेळ, अभ्यास, एकत्रित डबा खाणे, शाळेतील सहल अशा विविध जुन्या आठवणींना उजाळा दिल्या. कार्यक्रमानंतर सर्व उपस्थित गुरुजणांसह माजी विद्यार्थ्यांनी स्नेह भोजनाचा आस्वाद घेतला.
प्रास्ताविक रेखा बनसोडे सूत्रसंचालन रघुनाथ चिटकीन तर आभार विवेक शिंगे यांनी मानले. मेळावा यशस्वितेसाठी शिवराज मोने, योगेश पाटील, पुरुषोत्तम गुंड, मधुकर शेराल, संगीता निंबाळकर, रुपाली बसुदे, वर्षा होमकर तसेच मनपा परिवहन समितीचे माजी सभापती जय साळुंके यांनी परिश्रम घेतले. या स्नेहमेळाव्यास नलावडे मॅडम, होटकर सर, कोतवाल सर, मुल्ला सर, इंगळे सर, जहागीरदार सर, कंजारे सर, कोष्टी सर, हिरेमठ सर, एन.डी. जाधव सर, अनिल धोत्रे सर, सुनील धोत्रे सर, नलावडे, सुरेश देवकर यांनी शुभेच्छा दिल्या.
What's Your Reaction?






