लाडक्या बहिणींना करणार लखपती दिदी, मुख्यमंत्री फडणवीसांची ग्वाही
लाडक्या बहिणींना करणार लखपती दिदी, मुख्यमंत्री फडणवीसांची ग्वाही
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला लखपती दीदी ही योजना दिली आहे. महापालिकेवर भाजपा सत्ता आल्यानंतर लाडक्या बहिणींना लखपती दिदी बनविण्यात येणार आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी झालेल्या विजय संकल्प सभेत सांगितले. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, जोपर्यंत देवा भाऊ मुख्यमंत्री आहे, तोपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. लाडक्या बहिणींनी काळजी करू नये. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या लखपती दीदी या योजनेच्या महाराष्ट्रात 50 लाख लाभार्थी महिला आहेत. पुढील चार महिन्यात लखपती दीदी या योजनेचा एक कोटी महिलांना लाभ मिळेल. लाडक्या बहिणी अर्थव्यवस्थेला चालना देणार आहेत. आम्ही आश्वासने देणारे नाहीत तर आश्वासने पूर्ण करणारे आहोत, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याप्रसंगी म्हणाले.
What's Your Reaction?