आयटी पार्कला फडणवीसांचा बूस्टर! विजय संकल्प सभेत देवाभाउंचे व्हीजन!!

सोलापूरच्या उच्चशिक्षित तरुणांना रोजगार,स्थलांतरही रोखणार, आयटी पार्कचे स्वप्न साकारणार

Jan 11, 2026 - 13:19
 0  227
आयटी पार्कला फडणवीसांचा बूस्टर! विजय संकल्प सभेत देवाभाउंचे व्हीजन!!

(विजयकुमार पिसे)

सोलापूरसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्हीजन डाक्युमेंटरी सादर करून उच्चशिक्षित युवकांना आपलेसे केले. यामध्ये प्राधान्याने अत्याधुनिक आयटी पार्क हे लक्ष्य आहे. ज्यामुळे येथे हक्काचा रोजगार मिळेल आणि मोठ्या प्रमाणात होणारे स्थलांतरही रोखले जाईल. त्यामुळे फडणवीसांची विजय संकल्प सभा भाजपासाठी निर्णायक ठरेल असे मानले जाते. 15 जानेवारी रोजी मतदारांचे लक्ष आता फक्त कमळ हेच चिन्ह आहे.

अत्याधुनिक आयटी पार्क उभारून सोलापुरातील तरुणांना इथेच मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध करून देण्यास आमचे प्राधान्य आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपाच्या विजय संकल्प सभेत जाहीर केले. गेल्या अनेक वर्षांपासून सोलापूरकरांचे स्वप्न असलेले आयटी पार्क काही महिन्यांपूर्वीच मंजूर झाले असून ते आता दृष्टीक्षेपात आहे. सोलापुरातील उच्चशिक्षित तरुणांना सोलापूर शहरातच नोकरीच्या मोठ्या संधी मिळाव्यात यासाठी सोलापूरकर आग्रही आहेत. मात्र सोलापुरातील उच्चशिक्षित तरुणांना सोलापूरच्या बाहेर जाऊन नोकरी शोधावी लागत आहे. सोलापूर शहरातील हजारो तरुण वेगवेगळ्या नोकरी, रोजगारासाठी शहराबाहेर स्थलांतरित झाले आहेत. त्यामुळे आयटी पार्कबाबत मुख्यमंत्री काय बोलणार याकडे सोलापूरकरांचे लक्ष होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहर उत्तर मतदारसंघात दहिटणे येथील घरकुल वाटप कार्यक्रम प्रसंगी आ. विजयकुमार देशमुख यांनी आयटी पार्कबाबत मुद्दा उपस्थित केला होता, तर आ.देवेंद्र कोठे यांनी फडणवीसांकडे पत्र व्यवहार करून आयटी पार्कची मागणी केली होती. तसेच आ.सुभाष बापू यांनी दक्षिण सोलापूऱ मतदारसंघात होटगी तलाव जवळ आयटी पार्क करण्यासाठी पाठपुरावा केला होता. शहरातील तीनही आमदारांनी यासाठी आग्रही मागणी आता संकल्पपूर्ततेकडे जात आहे. त्या संदर्भात यापूर्वीच्या सोलापूर दौर्‍यात सोलापुरातील आयटी पार्कच्या उभारणीबाबत चर्चा करून आढावा घेतला होता. शनिवारी झालेल्या सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूरचे चित्र बदलण्यासाठी भाजपा सरकार कटीबद्ध असल्याची ग्वाही दिली होती. 

मुख्यमंत्री फडणवीसांच्या घोषणेमुळे अनेक वर्षे रखडलेली आयटी पार्कची मागणी आता पूर्णत्वास जाईल, असा विश्‍वास सोलापूरकरांमध्ये व्यक्त होत आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow