१००कोटींचा मद्य घोटाळा बनावट,सीबीआयवर ठपका,केजरीवाल ढसाढसा रडले
सिसोदिया,के.कवितासह सर्व 23जण निर्दोष,पुरा झाडू लगाया या शब्दात कोटी, अण्णा म्हणाले,केजरीवाल माझे पट्टशिष्य
नवी दिल्ली : दिल्लीत आम आदमी पार्टीच्या सत्ताकाळातील कथित 100 कोटींचा मद्य घोटाळाच बनावट असून सीबीआय खटला तयार करण्यात अपयशी ठरली, त्यामुळे हा बनावट घोटाळा आहे, असे निरीक्षण नोंदवत सीबीआयने अरविंद केजरीवाल,मनीष सिसोदिया आणि के.कविता सह सर्व 23 नेत्यांना निर्दोष मुक्त केले.
या धक्कादायक आणि अनपेक्षित निकालाने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. आम आदमी पार्टीचे *झाडू हे चिन्ह आहे, त्यामुळे *पुरा झाडू लगाया* या शब्दात निकालाची कोटी केली जात आहे. दरम्यान अण्णा हजारे यांनी या निकालाबद्दल आनंद व्यक्त करत केजरीवाल आणि सिसोदिया माझे पट्टशिष्य आहेत, या शब्दात अभिमान व्यक्त केला.
नवी दिल्ली येथील राऊस अव्हेन्यू कोर्टाने निर्दोष मुक्तता करताच अरविंद केजरीवाल यांना भावना अनावर झाल्या. कोर्टातून बाहेर येताच प्रसारमाध्यमांसमोर केजरीवाल ढसाढसा रडले. केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर गंभीर आरोप केले. आमच्याविरोधात संपूर्ण खोटं प्रकरण तयार करण्यात आलं. आम आदमी पक्ष संपवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह या दोघांनी स्वतंत्र भारतातील सर्वांत मोठं राजकीय षडयंत्र ठरले, या शब्दात हल्लाबोल केला.
अरविंद केजरीवाल यांच्यावर 100 कोटींच्या कथित मद्य घोटाळा प्रकरणी गंभीर आरोप झाल्यानंतर ईडीने त्यांना अटक केली होती. तुरुंगातून काही काळ मुख्यमंत्रिपदाचा कारभार पाहिला. नंतर त्यांना पदावरून पायउतार व्हावे लागले. पुढे दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाचा धुव्वा उडाला. मात्र ज्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापले होते त्या मद्य घोटाळ्यात अरविंद केजरीवाल, माजी उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांच्यासह अन्य आरोपींची कोर्टाकडून निर्दोष मुक्तता झाली आहे. त्यामुळे सीबीआयच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
भारताच्या इतिहासात प्रथमच एका मुख्यमंत्र्याला दारू घोटाळ्यात सहा महिने आणि उपमुख्यमंत्री सिसोदिया यांना जवळपास दोन वर्षे तुरुंगात राहावे लागले. पण हा घोटाळाच साफ खोटा, बनावट निघाला. आमची प्रतिमा खराब करण्यासाठी हा चिखलफेक करण्यात आली. आम्ही प्रामाणिक आहोत, हे आता कोर्टानेच सांगितले आहे, असे नमूद करत केजरीवाल यांना अश्रू अनावर झाले.
What's Your Reaction?