तेव्हा चौकीदार चौर है। आता वोटचोर, मोदी चोर!
राहुल गांधी,तेजस्वी यादवच्या नॅरेटिव्हचा बिहारमध्ये नवा जुमला

(विजयकुमार पिसे)
राफेलवरून 2019 मध्ये राहुल गांधी यांनी सुप्रीम कोर्टात मागितली माफी, शिवाय लोकसभेत दारुण पराभवही. अशी दुहेरी थप्पड बसली
आठवा 2019 ची लोकसभा निवडणूक.... राफेल विमान खरेदी व्यवहारावरून राहुल गांधी यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना, "चौक़ीदार चोर है"। म्हणत लक्ष्य केले होते. तेव्हा मोदी यांनी "मै भी चौकीदार" ही "टॅगलाईन" केली, कोट्यवधी देशबांधवांनी हीच लाईन ओढली. आणि इव्हीएमवर कमळाचे बटनही दाबले. अपेक्षेप्रमाणे काँग्रेसचा दुसर्यांदा (2014नंतर) दारुण पराभव झाला. यंदा बिहारच्या निवडणुक़ीत राहुल,तेजस्वी यांनी वोटचोरचा जुमला आणला आहे. चौकीदार चोरवरून सुप्रीम कोर्टात राहुल गांधीनी तेव्हा माफी मागितली. यावेळी निवडणूक़ आयोगाने तर चक्क चंपीच केली आहे.
काही करा, मोदींना सत्तेवरून हटवा हेच लक्ष्य राहुल टीमचे आहे. त्यासाठी नॅरेटिव्हचा फंडा चालू आहे. संसदेचे कामकाज गुरुवारी संपले, वोटचोरीच्या गदारोळातच आटोपले. तत्क्षणी राहुल बिहारच्या वोटचोर रॅलीत गेले. ही आजची स्थिती. त्यामुळे बिहारची निवडणूक "चोरा"वरच "जोर" धरणार असे दिसते. यामुळे लालूपुत्र तेजस्वी यादवना "बिहारचा विकास,रोजगार,जंगल राज, कायदा व सुव्यवस्था गये भाड मे," म्हणण्याशिवाय पर्याय राहिलेला दिसत नाही. कारण राहुलच्या चोर आवाजात आपलाही "चोर -जोर" धरला आहे.
एप्रिल 2019 मध्ये राफेल विमान खरेदी प्रकरणात, विरोधकांनी संरक्षण दलाशी संबंधित गहाळ काही संवेदनशील कागदपत्रांचा वापर क़ेल्यामुळे ही याचिका फेटाळण्यात यावी, अशी विनंती केंद्राने न्यायालयाला केली होती. सरकारची ही विनंती न्यायालयात फेटाळल्यामुळे राहुल गांधी यांनी, हा आपला विजय आहे, असा अर्थ काढून चौकीदार चौर है, चा नारा दिला. काँग्रेसी नेत्यांनीही 'चौकीदार चोर है' या नावाचे टी शर्ट अंगावर चढवून देेशात "चोर" वातावरण केले. पण...
*चौकीदार चौर है, चा नॅरेटिव्ह अंगलट...*
दरम्यान 12 एप्रिल 2019 मध्ये दिल्लीच्या भाजपा खा. मीनाक्षी लेखी यांनी सर्वोच्च न्यायालयात अब्रुनकसानीचा दावा ठोकला. न्यायालयाने राहुल गांधींना जाब विचारला. न्यायालयाने "चौकीदार चौर है" असा दावा कधीही केला किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात केलेल्या आरोपाचे समर्थनही केले नाही. हे प्रकरण अंगलट येणार हे लक्षात येताच राहुलनी, प्रचाराच्या गरमागरमीत, गैरसमजातून आणि अजाणतेपणी झाल्याचे सांगून बिनशर्त माफी मागितली. 'तुम्ही ज्या पदावर आहात, तिथे बोलताना भविष्यात सजग राहा, एखादे विधान करण्यापूर्वी तुम्ही न्यायालयाचा आदेश वाचतही नाही, हे दुर्दैवी आहे', या शब्दात राहुल गांधींची कानउघाडणी केली. चौकीदार चोरच्या नॅरेटिव्हचा अंगलट आलेला हा किस्सा...
नॅरेटिव्हचा आधार घेत 2024 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने जवळपास (99 जागा) शंभरी गाठली. त्यामुळे असाच नॅरेटिव्ह चालवण्याचे ठरवले आहे. हरियाणा, महाराष्ट्रात निवडणुका होऊन सहा महिन्यांचा कालावधी लोटला, तिथे वोटचोरी झाली, म्हणून आता बोंबा मारताहेत. पण दोन दिवसांपूर्वीच "लोकनीती,सीएसडीएस" यांनी ती पोस्ट डिलीट करून "चुकलो माफ करा", असे सांगत हात झटकले. इकडे आयोगानेही 'जे आरोप करताय, त्याचे शपथपत्र आठवड्याभरात सादर करा, नाही तर माफी मागा', या शब्दात राहुलना तंबी दिली आहे.
2019 मध्ये "चौकीदार चौर है" चा जुमला केला. तेव्हाही माफी मागितली, आणि मतदारांनी जागाही दाखवून दिली. आता बिहारच्या निवडणुकीत "वोटचोर"चा जुमला कसा चालतो, याकडे देशवासियांचे लक्ष्य आहेच.
What's Your Reaction?






