रात्री शांत झोप लागणाऱ्या नेत्याच्या प्रापर्टीजवर एसबीआयची कारवाई

माजी मंत्री,पत्नी, मुलगा,मुलगी यांचेवर 7.15 कोटींचे दोन कर्ज थकीत

Oct 26, 2025 - 11:12
 0  698
रात्री शांत झोप लागणाऱ्या नेत्याच्या प्रापर्टीजवर एसबीआयची कारवाई

(विजयकुमार पिसे)
  भाजपमध्ये गेल्यामुळे आता रात्री शांत झोप लागते, असे वक्तव्य करणारे काँग्रेसचे एक माजी मंत्री कोट्यवधी रुपयांच्या कर्ज प्रकरणामुळे अडचणीत आले आहेत. त्यांची पत्नी मुलगा,मुलगी यांच्या पुण्याजवळील प्रापर्टीज ताब्यात घेतल्याची नोटीस बजावली आहे. हे माजी मंत्री आहेत हर्षवर्धन पाटील. 
    हर्षवर्धन पाटील यांच्यावर व त्यांची मुले राजवर्धन, मुलगी अंकिता तसेच पत्नी भाग्यश्री यांच्या नावावर  प्रत्येकी 7 कोटी 15 लाख 37 हजार रुपयांचे दोन कर्ज आहेत.  मुदतीमध्ये कर्ज न फेडल्यामुळे सरफेसी कायद्यानुसार स्थावर/ जंगम मालमत्ता प्रतीकात्मक ताब्यात घेण्याची नोटीस बजावली आहे. यासाठी 31/7/2025 पर्यंतची मुदत  60 दिवसांची दिली होती. सदर थकीत दोन कर्जाची मुदत संपल्यामुळे एसबीआयने प्रापर्टीजचा प्रतीकात्मक ताबा घेतल्याचे जाहीर केले आहे. ह्या दोनही प्रापर्टीज पुण्याजवळील कोरेगाव रोड घोरपडी येथील आहेत. तसेच भाग्यश्री हर्षवर्धन पाटील यांचे जिथे वास्तव आहे, ती प्रापर्टीज देखील एसबीआयने ताब्यात घेण्याची कार्यवाही केली आहे. तसेच कर्ज फेडीची जबाबदारी  हर्षवर्धन पाटील परिवाराने पार पाडली नाही, तर त्या प्रापर्टीजची विक्री करून थकीत कर्ज वसुली पूर्ण केली जाईल, असे एसबीआयने जाहीर केले आहे.
    हर्षवर्धन पाटील  काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस असा प्रवास केलेले आमदार असून शरद पवार आणि अमित शाह यांचेशी आजही विश्वासू म्हणून परिचित आहेत. साखर उद्योगाशी संबंधित फेडरेशनचे प्रमुख जबाबदारी हर्षवर्धन पाटील यांचेकडे आहे. 
     एसबीआयची जप्ती कारवाई टाळण्यासाठी अति निकटवर्तीय शरद पवार व अमित शाह कोणती भूमिका पार पाडतील, याची उत्सुकता आहे. जेणेकरून हर्षवर्धन पाटील यांना रात्रीची शान्त झोप लागू शकेल.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow