दिवाळीनंतर ऑपरेशन सिंदूर 2
तिसरा धक्का : विजयकुमार पिसे
ऑपरेशन सिंदूर 23 मिनिटात फत्ते झाले. मे मध्ये पहलगामच्या भ्याड हल्ल्यानंतर भारतीय जवानांनी आठवडाभरात पाकिस्तानात घुसून पाकच्या दहशतवाद्यांचा बीमोड केला. त्या तडाख्यानंतर पाकिस्तान अजून सावरलेला नाही. एकीकडे पाकिस्तानातच दहशतवादी ह्ल्ले, आक्रमक झालेले बलुच आणि सिंध प्रांत आणि शेजारचा कट्टर मित्र अफगाण आणि पाकमध्ये युध्द पेटले आहे. अंतर्गत आणि बाह्य आक्रमणांनी त्रस्त पाकिस्तानवर आणखी एक संकट दिवाळीनंतर कोसळणार आहे. ऑपरेशन सिंदूर 2 चा धमाका. संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी स्वदेशी तेजस फायटर लॉन्च केला. तेजस एमके1ए फायटर पाकसाठी काळ ठरेल, असे संरक्षण तज्ञांचे मत आहे. भारतीय संरक्षण दलाने यासाठी दिवाळीनंतरचा मुहूर्त नक्की केला आहे. तेजसचा कमाल वेग 2200 कि.मी.तास हवेत इंधन भरण्याची क्षमता, प्रगत रडार, इले.युध्द प्रणाली. असा तेजसचा धमाका असून फ्रान्सचे राफेल, अमेरिकन एफ16, आणि चीनच्या जेएफ 17 पेक्षा तेजस अतिप्रगत आहे. नाशिकच्या ओझर येथील प्रक़ल्पातून तयार केलेल्या सुखोईवर ब्रह्मोसने ऑपरेशन सिंदूरमधून दहशतवादी टिपले होते. तेजस फायटर म्हणजे भारतीय संरक्षण दलाच्या आत्मनिर्भरतेचे उड्डाण आहे. भारताच्या आत्मनिर्भरतेसमोर अमेरिकाही सावध आहे. जर्जर पाकिस्तानवर जेव्हा तेजस गगगनभेदी गर्जना करेल तेव्हा दहशतवाद्यांची क़ाही खैर नाही.
What's Your Reaction?