धक्कादायक सर्व्हे; भाजपाची 287 वर मुसंडी, काँग्रेसची पुन्हा घसरण, लोकसभेच्या 20 जागा धोक्यात

धक्कादायक सर्व्हे; भाजपाची 287 वर मुसंडी, काँग्रेसची पुन्हा घसरण, लोकसभेच्या 20 जागा धोक्यात*

Jan 29, 2026 - 23:52
 0  470
धक्कादायक सर्व्हे; भाजपाची 287 वर मुसंडी, काँग्रेसची पुन्हा घसरण, लोकसभेच्या 20 जागा धोक्यात

 (विजयकुमार पिसे)

गेल्या वर्षभरात देशभरात झालेल्या निवडणुका आणि सध्या राज्यात सुरू असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा कौल पाहता देशात लोकसभेची मध्यावधी निवडणूक झाल्यास भाजपाला स्पष्ट बहुमत मिळेल, असा अंदाज आहे. भाजपा प्रणित एनडीए आघाडीला 352 जागा, तर काँग्रेस प्रणित इंडिया आघाडीला 182 जागांवरच ब्रेक लागण्याची शक्यता आहे. इंडिया टुडे-सी व्होटरच्या सर्व्हेनुसार ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. 

    देशामध्ये आज लोकसभा निवडणूक झाल्यास भाजपाला स्पष्ट बहुमत मिळण्याचा अंदाज आहे. 2024 मध्ये लोकसभा निवडणुकीत भाजपला फटका बसला होता. 2014 आणि 2019 मध्ये स्पष्ट बहुमत मिळवणार्‍या भाजपला 2024 मध्ये बहुमतापासून 32 जागा कमी होत्या. 2019 मध्ये 303 जागा जिंकणार्‍या भाजपला फक्त 240 जागांवर समाधान मानावं लागलं. त्यामुळे मित्रपक्षांच्या साथीने तेलुगू देशम आणि जदयू या प्रादेशिक पक्षांची मदत घेऊन भाजपला सत्ता स्थापन करावी लागली. 

प्राप्त सर्व्हेनुसार सध्याच्या परिस्थितीत निवडणूक झाल्यास एनडीएला 47 टक्के, इंडिया आघाडीला 39 टक्के मते मिळतील, असा अंदाज आहे. तर अन्य पक्षांना 14 टक्के मते मिळू शकतील. हे सर्वेक्षण 8 डिसेंबर 2025 ते 21 जानेवारी 2026 या कालावधीत करण्यात आले आहे. या सर्व्हेमध्ये 36 हजार 265 जणांचा सहभाग होता. एनडीएला 352 जागा, तर इंडिया आघाडीला 182 जागा मिळू शकतील. 2024 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत एनडीएला 293 जागा (भाजपा 240) मिळाल्या होत्या. तर इंडिया आघाडीने 234 जागांवर यश मिळवले होते. तेव्हा काँग्रेस 99 पर्यंत पोहोचली होती. त्यामध्ये आता 20 जागांची घसरण होईल, असे मानले जाते. एनडीएची मते 4 टक्क्यांनी वाढतील, असा एक अंदाज आहे. मात्र केवळ 1 टक्का मतदान घटले तर इंडिया आघाडीच्या तब्बल 52 जागा कमी होतील, असे सर्व्हे सांगतो. भाजपला 287 जागांवर यश अपेक्षित आहे. 2024 मध्ये 'संविधान खतरे मे' चा नारा देऊन नॅरेटिव्ह तयार झाला होता. परिणामी भाजपला 240, तर काँग्रेसला 99 जागा मिळाल्या होत्या. 2024 मध्ये झालेल्या निवडणुकीतील निकाल पाहता आता भाजपच्या 47 जागा वाढतील आणि काँग्रेसच्या 19 जागा कमी, असे चित्र अपेक्षित आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow