मोदींची देवाभाऊसाठी वचनपूर्ती

17 सप्टेंबर ! देशाचे समर्थ नेतृत्व श्री नरेंद्र जी मोदी वाढदिवस विशेष...

Sep 17, 2025 - 00:28
Sep 17, 2025 - 00:38
 0  209
मोदींची देवाभाऊसाठी वचनपूर्ती

देशात नरेंद्र, राज्यात देेवेंद्र हे समीकरण 2014 पासून अतूट  आहे. फडणवीस सर्वप्रथम 2014 मध्ये मुख्यमंत्री झाले, त्यापूर्वीच नरेंद्र आणि देवेंद्र  समीकरणाची चर्चा सुरू झाली होती. 2014 ते 2019 पाच वर्षे भाजपाचे पहिले आणि तेही यशस्वी मुख्यमंत्री म्हणून फडणवीस यांची नोंद झाली. 2019 मध्ये पुन्हा मुख्यमंत्री झाले. परंतु 2022 मध्ये फडणवीस यांना उपमुख्यमंत्री म्हणून काम करावे लागले. तेव्हा नाराज फडणवीसांना नरेंद्र मोदी यांनी शब्द दिला होता, त्याची वचनपूर्ती 2024 मध्ये केली. नेत्याचा कार्यकर्त्याला दिलेला शब्द आणि कार्यक़र्त्याचा नेत्यावरचा विश्‍वास. पार्टी विथ डिफरन्सचा हा अनुभव फक्त भाजपातच...  

    *देवेंद्र फडणवीस प्रारंभीपासूनच पक्षाचे शिस्तबद्ध कार्यकर्ते म्हणून राहिले आहेत. पक्षश्रेष्ठींच्या प्रत्येक आदेशाचे पालन केले. तसेच निवडणुकीत जोरदार प्रचार मोहीम राबवली. त्याचे फळ त्यांना मिळाले. ते महाराष्ट्राचे तिसर्‍यांदा मुख्यमंत्री झाले. 
    *महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महायुतीचे सरकार अस्तित्वात आले. देवेंद्र फडणवीस:3 सरकारमध्ये एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे दोन उपमुख्यमंत्री आहेत. विधानसभा निवडणुकीचे निकाल 23 नोव्हेंबर रोजी लागल्यानंतर तब्बल बारा दिवसांनी फडणवीसांचा शपथविधी समारंभ झाला. या बारा दिवसांत अनेक घडामोडी घडल्या. एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदासाठी आग्रही असल्याची चर्चा होती. परंतु भाजप आता मुख्यमंत्रीपद सोडण्यास तयार नव्हते. तसेच 2022 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिलेले आश्‍वासन पूर्ण करण्याची संधी मिळाली होती. ती मोदींनी पूर्णत्वास नेली.


*आश्‍वासनाची वचनपूर्ती...
30 जून 2022 रोजी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारण्यास नकार दिला. त्यांनी पक्षसंघटनेचे काम करण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी नम्रपणे स्वीकारली. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढील वेळेस सत्तेत आल्यावर फडणवीस यांना सन्मानजनक पद देण्याचे आश्‍वासन दिले होते.
    *देवेंद्र फडणवीस यांनी 2022 मध्ये मुख्यमंत्रीपदाचा त्याग केला होता. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पू.सरसंघचालक डॉ. मोहनजी  भागवत यांचे मन जिंकले होते. त्यामुळे ते दोघांचे अतिशय जवळचे  विश्‍वासू झाले होते. 2024 मध्ये सत्ता येताच त्यांची पसंती देवेंद्र फडणवीसच होती. मनोज जरांगे यांच्या मराठा आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करण्याबाबत संशयकल्लोळ होता. परंतु नरेंद्र मोदी यांची पसंती फडणवीस असल्यामुळे मुख्यमंत्रीपदाची माळ त्यांच्याच गळ्यात पडली. 


देवेंद्र फडणवीस पक्षाचे शिस्तबद्ध कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. पक्षश्रेष्ठींच्या आदेशाचे पालन करतात. त्याचे फळ त्यांना मिळाले. हाच अनुभव पक्षाच्या असंख्य कार्यकर्त्यांनीही लक्षात घेतला पाहिजे. फडणवीस यांची ही अपेक्षा नरेंद्र जी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त करूया.... 

https://lakshyawedh.com/bjp-solapur-election-mla--devendrafadanvis

देवेंद्रच का? हे ही वाचा विशेष स्टोरी...


    *दरम्यान नरेंद्र मोदींचा पुढचा वारसदार महाराष्ट्रातून असेल आणि तो संघ ठरवेल, असे  विधान खा.संजय राऊत यांनी एकदा केले होते. त्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रोखठोक प्रतिक्रिया दिली. वडील जिवंत असताना मुलांचा विचार करायचा नाही, तो होत नसतो. त्यामुळे मोदींचा उत्तराधिकारी निवडण्याची वेळ अजून आलेली नाही.


   *मोदींचा उत्तराधिकारी शोधण्याचं कोणतंही कारण नाही, नरेंद्र मोदी हे आमचे नेते आहेत, अजून बरीच वर्षं ते काम करणार आहेत. आमच्या सगळ्यांचा आग्रह आणि विश्‍वास आहे, 2029 पर्यंतचा कार्यकाळ ते पूर्ण करतील. तसेच त्यानंतरही पंतप्रधान म्हणून आम्ही नरेंद्र मोदी यांच्याकडेच पाहतो आहोत. संपूर्ण देशही तेच बघत आहे. अशा भावना फडणवीस यांनी मोदींविषयी व्यक्त केल्या आहेत. 
  आज 17 सप्टेंबर रोजी सक्षम नेतृत्व असलेले देशाचे समर्थ प्रधानमंत्री श्री नरेंद्रजी मोदी यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा आणि देशासाठी त्यांना उदंड आयुरारोग्य लाभो : देवेंद्र फडणवीस, (मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य)

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow