वोट चोरीचा मामला, डिलीट पोस्टवर आता बोंबला...
त्या डिलीट पोस्टमुळे काँग्रेस तोंडघशी, नको तिथे नाक खुपसलेल्या लोकनीती-सीएसडीएसचा माफीनामा, भाजपाचा राहुलवर हल्लाबोल, एक्झीट पोलवाल्यांची पुन्हा पोलखोल

(विजयकुमार पिसे)
निवडणूक बिहारची, वाद एसआयआरचा, यात बोगस मतदारांची नावे उघडकीस अशा फजितवाड्यात भर, काँग्रेसच तोंडघशी पडली. लोकनीती-सीएसडीएसने आधी नाक खुपसले, नंतर घोडचूक लक्षात आल्यामुळे ती पोस्ट डिलीट करून माफीनामा मागितला. निवडणूक विश्लेषक संजय कुमारवर नामुष्की ओढवली. परिणामी भाजपाचे प्रवक्ते अमीत मालवीय यांनी राहुल गांधीवर हल्लाबोल करून राळ उडविली. वोटचोरीच्या तापलेल्या मुद्द्यावर नवा ट्विस्ट आला आहे.
निवडणूक़ काळात मतदारांचा कल मतदानानंतर एक्झीट पोल यामध्ये अनेकदा अशा अनेक एजन्सीज तोंडघशी पडले आहेत. त्यांचे एक्झीट पोल "फोल" ठरलेत असा अनुभव आहे. तरीही लोकनीती-सीएसडीएसने पुन्हा एकदा आपले हात पोळून घेत ही व्यवस्था किती अविश्वसनीय आहे, हे देखील अधोरेखित केले
निवडणूक विश्लेषक संजय कुमार यांनी त्यांची एक्स पोस्ट डिलीट क़रून आधी खळबळ उडवून दिली. नंतर लोकनीती-सीएसडीएसला चूक लक्षात आली. त्यामुळे त्यांच्यावर पोस्ट डिलीट करून चक्क माफीनामा मागावा लागला. लोकनीती-सीएसडीएसने 2024 च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या दरम्यान नाशिक पश्चिम आणि हिंगणा या विधानसभेच्या दोन निवडणुकांमध्ये मतदारांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याची एक्स पोस्टच्या माध्यमातून दिली. त्याआधारे काँग्रेसने वोट चोरीवरून राळ उडविली. पण पोस्ट डिलीट केल्यामुळे काँग्रेसचे हसे झाले. काँग्रेसचे राहुलकुमार, संजयकुमारच्या एक्स पोस्टचा संदर्भ देत होते. संजय कुमारनी पोस्ट डिलीट तर केलीच शिवाय माफीही मागितली. मग काय? भाजपाने काँग्रेसला धू...धू धुतले.
महाराष्ट्राच्या निवडणुकीशी संबंधित पोस्टच्या ट्विटसाठी मी माफी मागतो. निवडणुकीच्या आकड्यांची तुलना करताना चूक झाली, असे म्हणत लोकनीती-सीएसडीएसचे निवडणूक़ विश्लेषक संजयकुमारनी ते ट्विट हटवले. अतिउत्साहात सीएडीएसने खातरजमा न करताच तुलनात्मक आकडेवारी जाहीर करत स्वत:चा नादानपणा सिध्द केला. काँग्रेसची मर्जी राखायला गेले, त्या काँग्रेसचीही या प्रक़ारात पोलखोल झाली.
What's Your Reaction?






