लक्ष्यवेध न्यूजच्या संघ ‘विचार दर्शन २०२६’ दिनदर्शिकेचे पंढरीत प्रकाशन

ह.भ.प.श्री औसेकर महाराज यांचे आशीर्वचन

Feb 7, 2026 - 00:15
Feb 7, 2026 - 12:09
 0  218
लक्ष्यवेध न्यूजच्या संघ ‘विचार दर्शन २०२६’  दिनदर्शिकेचे पंढरीत  प्रकाशन

पंढरपूर : लक्ष्यवेध न्यूज पोर्टलच्या संघ शताब्दी निमित्त ‘विचार दर्शन २०२६’ या दिनदर्शिकेचे प्रकाशन तीर्थक्षेत्र पंढरपूर येथे शुक्रवारी ६ रोजी विठ्ठल रुक्मिणी मंदिरात अत्यंत भक्तिभावपूर्ण वातावरणात पार पडला. श्री विठ्ठल–रुक्मिणी मंदिरे समितीचे सहअध्यक्ष ह.भ.प. श्री गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या शुभहस्ते "विचार दर्शन २०२६" दिनदर्शिकेचा प्रकाशन सोहळा करण्यात आला.

     ह.भ.प. श्री.औसेकर महाराज यांनी आर्शीवचन देताना सांगितले, विचार दर्शन २०२६ दिनदर्शिकेत संघ शताब्दीनिमित्त गत १०० वर्षातील शंभर घटनांचा संदर्भ दिला आहे. वैचारिक आशय, मांडणी व समाज जागरण दृष्टिकोनाचे त्यांनी विशेष कौतुक केले. ही दिनदर्शिका वाचकांना सकारात्मक विचारांची दिशा देणारी असल्याचेही त्यांनी आवर्जून नमूद केले.

    या कार्यक्रमास मंदिर समितीचे सदस्य ज्ञानेश्वर देशमुख जळगावकर महाराज, शकुंतला नडगिरे, तसेच उपजिल्हाधिकारी व मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, लक्ष्यवेध न्यूजचे संपादक तथा विश्व हिंदू परिषदेचे सहमंत्री विजयकुमार पिसे यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी लिंगराज जावळकोटे, पत्रकार तेजस मुद्दे, मंडल अधिकारी प्रवीण घम यांच्यासह अनेक मान्यवर मंडळी प्रकाशन सोहळ्यास उपस्थित होती.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow