गोरक्षा, गोवसंवर्धनाची यशोगाथा! गायत्री, लक्ष्मी यांना झाले खोंड
गोरक्षक जय साळुंके आणि पंचमुखी हनुमान मंदिर भक्त मंडळीना आनंद, गोप्रेमींनी गोरक्षण, गोसंवर्धनासाठी बोध घेण्याची आवश्यकता

(विजयकुमार पिसे)
मठ, मंदिर, आश्रम,गोरक्षणासाठी हमखास सुरक्षित. या ठिकाणच्या गोशाळेत भाकड गायी, बैल, मोकाट जनावरे आणि गोवंश पालन गोरक्षक आणि भक्तमंडळी नियमितपणे करतात, असा अनुभव. सोलापुरात पंचमुखी हनुमान मंदिर आणि हिंदुत्ववादी कार्यकर्ते जय साळुंके यांच्या गोशाळेतील गायींना नुकतेच दोन खोंड झाले. बकरी ईदच्या काळात बेसुमार गोहत्येची भीती त्या पार्श्वभूमीवर गायींना दोन खोंड झाल्याची वार्ता जेव्हा कानावर आली, तेव्हा अनेक गोभक्तांना आनंद झाला. कुतूहल जागे झाले.
विश्व हिंदू परिषद गोरक्षा आणि गोसंवर्धनासाठी विशेष प्रयत्नशील. यासाठी त्यांची विशेष टीम सक्रियपणे कार्यरत. बजरंग दल यासाठी नेहमीच आक्रमक. त्यामुळे यंदा बकरी ईदच्या काळात अनेक ठिकाणी गोवंश वाचवण्यात बर्यापैकी यश आले, ही वस्तुस्थिती. या दरम्यान दोन गायींना खोंड झाल्याची सुवार्ता कानावर आली.
पंचमुखी हनुमान मंदिरातील गायत्रीने नुकतेच एका खोंडाला जन्म दिला आहे. तीन महिन्यापूर्वी फेब्रुवारीत पंचमुखी हनुमान मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळ्याप्रसंगी एका गोभक्ताने मंदिराला गायत्री दान केली होती. तेव्हा गोदानाचा विधीवत कार्यक्रमही झाला. मंदिराला गोदान सेवेचा अनुभवही पहिल्यांदाच. यावेळी उपस्थित गोभक्तांनाही खूप आनंद झाला. पंचमुखी मंदिराचे सेवक, विश्वस्त आणि संघाचे स्वयंसेवक गायत्रीची व खोंडाची देखभाल करतात. पंचमुखी हनुमान मंदिरात प्रभात आणि सायम शाखा भरते, शाखा सुटल्यानंतर स्वयंसेवकही त्यांची काळजी घेतात,असे मंदिराचे सचिव सत्यनारायण गुर्रम म्हणाले.
पंचमुखी हनुमान मंदिरातील गायत्री जन्मलेल्या खोन्डासह.
गोभक्त जय साळुंके यांचा अक्कलकोट एमआयडीसी येथे फॅब्रिकेशनचा कारखाना आहे. तिथेच त्यांनी गोशाळा उभी केली. गोमाता लक्ष्मीने नुकतेच एका खोंडाला (कन्हैया) जन्म दिला आहे. जय आणि त्यांचे बंधू अजय हे स्वत: जातीने लक्ष्मीची देखभाल करतात. गोधन पालनातून याठिक़ाणी वेगळीच अनुभूती येते. वातावरण सकारात्मक होते. सायंकाळच्या सुमारास गोवर्यांची आगटी पेटवल्यानंतर शेजारचे एक डॉक्टर कुटुंबीय आगटीने होणार्या धुरामुळे हरकत घ्यायचे. पण नंतर नंतर त्यांनाही गोवर्याच्या धुरामुळे चांगला अनुभव आला. त्यांच्या शारीरिक व्याधीही कमी झाल्या. साळुंके यांना व्यवसायात वृध्दी झाली. विहिंप, संघ कार्यकर्ते तसेच जय साळुंके यांचे काका देखील गोसंवर्धनसाठी प्रवृत्त केले. गोमाता लक्ष्मी संघ स्वयंसेवक जगदीश कर्रे यांनी आमच्या गोशाळेसाठी दिली, अशी माहिती साळुंके यांनी दिली.
भाजपा शहर उपाध्यक्षपदी कार्यरत जय साळुंके स्वयंसेवक असून विहिंप आणि बजरंग दलाचे दायित्व त्यांनी यापूर्वी पार पाडले आहे. त्यामुळे गोधनाचे महत्व त्यांना ज्ञात आहे. साळुंके यांच्या गोशाळेतील गौरी अलीकडेच गॅस्ट्रोने निवर्तली. तिनेही खोंडाला जन्म दिला होता. बळी नावाचा हा खोंड आता तरतरीत झाला असून त्याचीही देखभाल येथे होते.
गोवंश टिकला तर पर्यावरण व मानवी जीवनही सुकर आणि सुखकर होणार आहे. त्यामध्ये धर्माभेद कसला? त्याची होणारी हत्या निंदनीयच. गोमाता ही आपली आई समजूनच तिचे करा संरक्षण आणि संवर्धन. जय गोमाता॥
What's Your Reaction?






