सेस रद्दसाठी शुक्रवारी व्यापाऱ्यांचा बंद

६ हजार व्यापारी बंदमध्ये सहभागी होणार: चिक्कळी

Dec 4, 2025 - 11:01
 0  155
सेस रद्दसाठी शुक्रवारी व्यापाऱ्यांचा बंद

सोलापूर: भुसार आडत व्यापारी संघ सोलापूर येथे कृषी 
उत्पन्न बाजार समितीमधील व्यापाऱ्यांच्या  सभेत शुक्रवारी ५ डिसेंबर रोजी बंदचा निर्णय एकमताने  झाला, असे अध्यक्ष सुरेश चिक्कळी यांनी जाहीर केले. 
      सदर सभेत भुसार आडत व्यापारी संघाचे सर्व कार्यकारीणी सदस्य, सल्लागार श्री तुकाराम काळे श्री प्रभाकर विभुते व व्यापारी सह दि सोलापूर कॅन्व्हासिंग एजंट्स असोसिएशन चे अध्यक्ष श्री श्रीशैल अंबारे, दि सोलापूर दाळ मिल ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष श्री प्रवीण भुतडा व बारदाना व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष श्री मल्लिनाथ कटप हे उपस्थित होते.
    श्री भुसार आडत व्यापारी संघाचे अध्यक्ष श्री सुरेश चिक्कळी यांनी महाराष्ट्र राज्य व्यापारी कृती समितीने महाराष्ट्रातील कृषी उत्पन्न बाजार समिती संदर्भातील समस्यां बाबत व्यापाऱ्यांच्या महाराष्ट्र बंद निर्णयाबद्दलची माहिती देऊन सर्व व्यापाऱ्यांनी आपापले व्यवहार एक दिवसासाठी बंद ठेवून लाक्षणिक बंदमध्ये सहभाग होण्याचे आवाहन केले.
    सदर एक दिवसाच्या लाक्षणिक बंदला उपस्थित दि सोलापूर कॅन्व्हासिंग एजंट्स असोसिएशन चे अध्यक्ष श्री श्रीशैल अंबारे, दि सोलापूर दाळ मिल ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष श्री प्रवीण भुतडा व बारदाना व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष श्री मल्लिनाथ कटप यांनी पाठिंबा जाहीर केला सदर सभेत उपस्थित व्यापाऱ्यांनी बंदला पाठिंबा दिला व सदर सभेस भुसार आडत व्यापारी संघाचे जेष्ठ सल्लागार श्री प्रभाकर विभूते यांनी लाक्षणिक बंद यशस्वी करण्यासाठी सर्व व्यापाऱ्यांनी व्यापारी संघटनांच्या पाठीशी उभे राहावे असे आवाहन केले. 
     सदर सभेचे सूत्रसंचालन संघाचे सेक्रेटरी तथा बाजार समितीचे संचालक श्री वैभव बरबडे व आभार संघाचे उपाध्यक्ष श्री अशोककुमार संकलेचा यांनी केले.  बाजार बंद ठेवण्याबाबतचे आवाहन अध्यक्ष सुरेश चिक्कळी आणि सेक्रेटरी वैभव बरबडे यांनी केले आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow