नानाचं कुणाला पटेल

एकनाथ शिंदे आणि अजीत पवार राज्याचे मुख्यमंत्री, असं होणार म्हणजे एप्रिल फूल. नानांची ही ऑफर कुणाला पटलं नाही बुवा. काँगे्रसींनाही. काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी शिंदे व पवार या उपमुख्यमंत्रीद्वयांना ऑफर दिली.

Mar 16, 2025 - 14:52
 0  103
नानाचं कुणाला पटेल

(विजयकुमार पिसे)
एकनाथ शिंदे आणि अजीत पवार राज्याचे मुख्यमंत्री, असं होणार म्हणजे एप्रिल फूल. नानांची ही ऑफर कुणाला पटलं नाही बुवा. काँगे्रसींनाही. काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी शिंदे व पवार या उपमुख्यमंत्रीद्वयांना ऑफर दिली. काँग्रेसमध्ये या, तुम्हाला मुख्यमंत्री करतो. (एकाच वेळी दोन मुख्यमंत्री? म्हणजे काँग्रेस घटना बदलणार आहे की काय?) महिनाभरापूर्वी पटोले असं म्हणाले असते तर त्यांच्यावर थोडाफार विश्‍वास ठेवणे शक्य होते. पटोलेंची खुर्ची जिथे शाबित नाही, तिथे मुख्यमंत्रीपदाची ऑफर म्हणजे एप्रिल फुल्ल. जिथे तिथे काँग्रेसची वाताहत सुरू आहे. दोनच दिवसांपूर्वी हरियाणात सर्व महापालिका निवडणुकांत काँग्रेसचा सुफडा साफ. महाराष्ट्रात उद्या या निवडणुका झाल्या तर काय गत होईल, याची शाश्‍वती त्यांच्याच पक्षातील कार्यकर्त्यांना नाही. शिवाय रोज वार्ता, अमुक नेता पक्ष सोडणार. कसब्याचे धंगेकर सहा महिन्यापूर्वी काँग्रेसच्या गळ्यातील ताईत होते. त्यांनीही पंजा सोडला, धनुष्यबाण हाती घेतले. सपकाळ प्रदेश अध्यक्ष झाल्यानंतर ताजा झटका. शिंदे आणि पवार यांचे स्वत:चे अस्तित्व आहे. उभयतांनी त्यांच्या पक्षप्रमुखांना (ठाकरे, पवार) हलाल केले. तिथे नाना पटोले म्हणजे...। म्हणतात ना हात दाखवून अवलक्षण. रौत आणि वरतीवार यांच्या प्रतिक्रियांनी पटोलेंचे लक्षण कळाले. एक खरंय, राजकारणात कधी काय होईल हे सांगता येत नाही. पण नानांचं टायमिंग चुकलं. नको त्या वेळी अलार्म वाजला. 
(बुरा ना मानो रंग बरसे)

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow