राजयोग... हडयोग...

प्रयागराज महाकुंभात 65 कोटीपेक्षा अधिक भाविकांनी डुबकी मारली. तिर्थही घेतले. आणि या 65 कोटीत मनसेचे बाळा नांदगावकर एक.  त्यांनी श्रध्देनं आपल्या नेत्याला गंगेचे तिर्थ दिले. ते स्वीकारायचे की नाही, हा ज्याचा त्याचा प्रश्‍न. पण राज ठाकरे गप्प कसे बसतील.

Mar 16, 2025 - 14:55
 0  116
राजयोग... हडयोग...

(विजयकुमार पिसे)
प्रयागराज महाकुंभात 65 कोटीपेक्षा अधिक भाविकांनी डुबकी मारली. तिर्थही घेतले. आणि या 65 कोटीत मनसेचे बाळा नांदगावकर एक.  त्यांनी श्रध्देनं आपल्या नेत्याला गंगेचे तिर्थ दिले. ते स्वीकारायचे की नाही, हा ज्याचा त्याचा प्रश्‍न. पण राज ठाकरे गप्प कसे बसतील. ते रोखठोक म्हणाले हड. मी नाही प्राशन करणार तीर्थ. म्हणजे गंगेचं पावित्र्य आणि पवित्र नाही? त्यांनी हड म्हटल्याने देशविदेशातील कोट्यवधी भाविकांच्या श्रध्देला ठेच पोहोचली. यमुनेविषयी गेल्या महिन्यात केजरीभाई असेच काही बरळून गेले. त्यानंतर त्यांचा सुफडा साफ झाला. राज ठाकरे नेहमी रोखठोक बोलतात. माझ्या हातात एकदा सत्ता द्या, पहा मग... नाशिककरांनी महापालिकेत सत्ता देउन पाहिलेय. दरएक निवडणुकीत राज ठाकरेंचा न्यूयोग प्रयोग असतो. तरीही इंजिन तिथेच. गत तीन वषार्र्पासून भगवायोग प्रयोग सुरू. तरीदेखील यंदा विधानसभेला हुलकावणी. मराठी किल्ल्यात राजकुमारचा भोंगा देखील नाही वाजला.  विश्‍वासार्हता नावाचा योग जुळून आला तरच...राजयोग. अन्यथा...
 (बुरा ना मानो रंग बरसे)

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow