इनकमिंगना मेरीटप्रमाणेच तिकीट! फडणवीस स्पष्टच म्हणाले;जुने निष्ठावंत निश्चिंत रहा!!
इनकमिंगना मेरीटप्रमाणेच तिकीट! फडणवीस स्पष्टच म्हणाले;जुने निष्ठावंत निश्चिंत रहा!!
(विजयकुमार पिसे)
गेले दोन महिने भाजपात मोठ्या प्रमाणात इनकमिंग सुरू आहे. भाजपातच आपले कल्याण होणार, अशी खात्री पटल्यामुळे राजकारणी *अण्णा,दादा,नाना, काका,मामा,ताई, अक्का यांची पक्षप्रवेशासाठी रिघ लागली. नव्हे तर होलसेल प्रवेश सोहळे पार पडले. यापुढेही सुरू राहील. पण त्यामुळे पक्षातील अनेक निष्ठावंत कार्यकर्ते दुखावले गेले. काहीजण हवालदिल झाले, तर असा संघर्ष करण्याची वेळ आलीच तर भाजपाला राम राम करण्याची तयारीही कार्यक़र्त्यांनी केली. *निष्ठावंतानो निश्चिंत राहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हौसे, नवसे इनकमिंगना स्पष्टच सांगितले. यांचे पक्ष प्रवेश करून घ्या. उमेदवारी,तिकीटाचे काही सांगू शकत नाही. शब्द देखील देत नाही. *मेरिटप्रमाणेच उमेदवारी दिली जाईल.
*ही अंदर की बात...
पक्षातील जुन्या निष्ठावंतांना खिजवण्यासाठी आणि कुजवण्यासाठी पक्षात आलेले अलीकडेचे काही नेते आम्हीच देवाभाऊच्या जवळचे आहोत. तुम्हाला तिकीट देणार, अशा थापा मारून भाजपात येण्यासाठी भरीस घातले. *नया ... जोरसे बांग देता है। असा हा प्रक़ार! अशी जोरात बांग देणार्यांचे पितळ उघडे पडणार आहे. इतकेच नव्हे तर अलीकडे पक्षाचे काही पदाधिकारी प्रवास करून बैठका घेत आहेत, निवडणुकीत तिकीट मेरिटप्रमाणेच मिळेल. माझा समर्थक, माझ्या जवळचा किंवा नातेवाईकांना कुणी शब्द दिला तर त्यावर विश्वास ठेवू नका, अशांना खड्यासारखे बाजूला काढले जाईल. तसेच कुणी स्वत:ला भावी मेंबर म्हणवून डिजीटल बॅनर,सोशल मिडियावर धुमाकूळ घालत असेल तर अशांची नोंद निश्चित घेतली जाणार आहे.
दोन दिवसांपूर्वी पक्ष कार्यालयाजवळ पोटफाडी चौकात असाच एक़ फलक सर्वांचे लक्ष वेधून घेत होता. त्या दिवशी मुंबईचे एक ज्येष्ठ नेते संघटनमंत्री कार्यालयात आल्यानंतर ही बाब त्यांच्या लक्षात आली. त्यांनी अशा इनकमिंग कार्यकर्त्यांना चांगलाच दम भरला. बूथ यंत्रणा मजबूत करा,त्याची समिती करा,मतदार याद्यांची छाननी करा, सतर्क रहा. कुणीही पक्षात आला आणि तिकीट घेतला,असे नाही. संबंधित नेत्यांनी देवाभाऊन्च्या भूमिकेविषयी स्पष्टच कल्पना दिली. शिवाय चुकीचे प्रवेश झाले असतील तर ते रद्द करण्याची तजवीज सुरू आहे. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी काही ठिकाणी उत्साहाच्या भरात भाजपात प्रवेश दिले, ते रद्द केल्याचे चव्हाण यांनी जाहीर केले.
नगर पालिका आणि नगर पंचायत निवडणुकीत महायुतीमध्येच घरफोडीचे प्रकार घडले. यामुळे महायुतीत मिठाचा खडा पडला. याची दखल केंद्रीय नेत्यांनी घेतली आणि इनकमिंगबाबत त्यांनी सावधानतेचा इशारा दिला आहे. त्यामुळे सगळ्याच इनकमिंगचे भाजपात कल्याण होईल,असे नाही. म्हणून निष्ठावंतांनी काळजी करण्याचे कारण नाही, असेही संबंधित नेते आपल्या प्रवासात, बैठकांमध्ये स्पष्टपणे सांगत आहेत.
What's Your Reaction?