प्र.26 कृष्णा कॉलनीत रस्ते कामाची सुरुवात, मा.नगरसेविका राजश्री चव्हाण यांचा निधी
नगरसेविका सौ. राजश्री अनिल चव्हाण यांच्या पाठपुराव्याला यश
जुळे सोलापुरातील प्रभाग क्रमांक 26 मधील कृष्णा कॉलनी येथे रस्ते कामास सुरुवात झाली असून मा.नगरसेविका सौ राजश्री अनिल चव्हाण यांच्या निधीतून हे काम होत असून त्यांच्या प्रयत्नाला यश आले आहे.
प्रभाग क्रमांक 26 मधील कृष्णा कॉलनी येथे लक्ष्मी कंट्रक्शन कडून ड्रेनेजची कामे करण्यात आली होती. नगरसेविका सौ.राजश्री चव्हाण यांच्या निधीतून सदर नगरामध्ये रस्ते करण्यात आलेले होते. ड्रेनेज लाईन केल्यामुळे सदरचे रस्ते उखडले गेले होते ते रस्ते आहे त्या स्थितीत बनवून द्यावे ते असे संबंधित लक्ष्मी कंट्रक्शनला सोलापूर महानगरपालिका आयुक्त व शासनाचे आदेश आहेत. परंतु सदर कामास दिरंगाई होत होती. सदर नगरातील नागरिकांनी वारंवार तक्रार करूनही दखल घेत नव्हते शेवटी सदर नगरातील नागरिकांनी ही बाब नगरसेविका सौ.राजश्री चव्हाण यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर यशस्वी पाठपुरावा केला.
केवळ चारच दिवसात सदर ठिकाणी रस्ते कामाला सुरुवात करण्यात आली आहे. सदरचा रस्ता झाल्यामुळे लक्ष्मी कंट्रक्शन कडून ते बॉम्बे पार्क पर्यंत जाणार्या रोडवर ड्रेनेजचे काम चालू असल्याने रस्ता बंद करण्यात आला आहे. त्यामुळे सदरचा पर्यायी रस्ता झाल्यामुळे जुळे सोलापुरातील सर्वसामान्य नागरिकांना डी मार्ट,आयएमएस कॉलेज, आसरा चौकाकडे जाण्यासाठी सोयीचे झाले आहे. त्यामुळे सर्व थरातून नगरसेविका सौ.राजश्री अनिल चव्हाण यांचे कौतुक होत आहे.
What's Your Reaction?