सोलापूर विमानसेवेचे गाजर
उद्योजकांचे गाजर आंदोलन, २०२४ मावळले, नव्या वर्षात जुमलेबाजी नको!

सोलापूर : होटगी रोड विमानतळावरून नागरी विमानसेवेचा मुहूर्त पुन्हा टळल्यामुळे सोलापूरकर संतापले असून येथील उद्योजकांनी गाजर आंदोलन करून सरकारचा निषेध केला. २०२४ मावळले, आता नव्या वर्षात जुमलेबाजी नको, या शब्दात निषेध नोंदविला.
सोलापूर विकास मंचच्या माध्यमातून गत चार वर्षे लढा सुरू आहे. विमानसेवेतील अडथळे दूर झाले. नूतनीकरणाचा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शुभारंभ केला.
२३ डिसेंबर २०२४ पासून विमानसेवा सुरू होईल, असे केंद्रीय नागरी उड्डयन राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी जाहीर केले. पण अद्याप हालचाल दिसत नाही. त्यामुळे उद्योजकांनी गाजर आंदोलन करून सरकारचे लक्ष वेधले.
गाजर आंदोलनात सोलापूर इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष डी. राम रेड्डी, इंजि. मिलिंद भोसले, केतन शहा, विजय जाधव, योगिन गुर्जर, सुहास भोसले, आनंद पाटील, दत्तात्रय अंबुरे, सुशील कुमार व्यास, इकबाल हुंडेकरी, नरेंद्र भोसले, हर्षल कोठारी, प्रसन्ना नाझरे, काशिनाथ भतगुणकी, अर्जुन रामगिर, सुभाष वैकुंटे, बिराजदार राजू, अशोक अहुजा, संजय वाकडे, गौरी अंबेकर, विनय वडगावकर, शुभदा पाटील, भरत पाटील, किसन रिकेबी, आरती अरगडे, अमृता अकलूजकर, नरसिंग मेंगजी, शैलेंद्र क्षीरसागर, प्रशांत भोसले, कुंडल राकेश, घनश्याम दायमा, नागेश काकी, अमित कामतकर, श्रीकांत अंजुटगी, श्रीनिवास पोटाबत्ती, लक्ष्मीकांत दंडी, बाळासाहेब मोरे, सुनील दस्सल, शशिकांत बनसोडे, प्रभाकर कमटम, परवेज पिरजादे, रवींद्र कोळी, महेश चिंचोळे, राजकुमार राठोड, अब्दुल शेख तसेेच उद्योगपती सुरवसे परिवार सहभागी झाले होते.
What's Your Reaction?






