विहिंप बजरंग दलाचे सोलापुरात शौर्य संचलन

शिवस्मारकात छत्रपती शिवरायांचे पूजन, सिध्देश्‍वर मंदिरात महाआरती

Dec 27, 2024 - 18:53
 0  426
विहिंप बजरंग दलाचे सोलापुरात शौर्य संचलन

सोलापूर : 1992 मधील वादग्रस्त ढाँचा पडला, त्या दिवसाच्या शौर्याच्या सन्मानार्थ सोलापुरात विश्‍व हिंदू बजरंग दलाच्या वतीने शौर्य संचलन काढण्यात आले. शिवस्मारक येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन आणि अभिवादन करून शौर्य संचलनास प्रारंभ करण्यात आला. आणि ग्रामदैवत श्री सिध्देश्र मंदिर येथे महाआराती करून शौर्य संचलनाचे समापन झाले. शौर्य संचलनात सुमारे साडेतीनशे बजरंगी त्रिशूळ धारण करून सहभागी झाले होते.

गीता जयंतीच्या पुण्यपावन दिनी 1992 रामजन्मभूमी येथील वादग्रस्त ढाँचा भुईसपाट झाला. त्या शौर्याचा सन्मान म्हणून विहिंप बजरंग दलाच्या वतीने शौर्य संचलन काढले जाते. 25 डिसेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता शिवस्मारक येथून संचलन मार्गस्थ झाले. राजवाडे चौक़, दत्त चौक़, स्वा.सावरकर मैदान, किल्ला बगीचा, नेताजी सुभाष चौक, चार पुतळा, डॉ. आंबेडकर पुतळा मार्गे सिध्देश्‍वर मंदिर येथे संचलन दाखल झाले. 

शौर्य संचलनापूर्वी शिवस्मारकात प्रभू श्रीराम यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी बजरंग दलाचे मुंबई क्षेत्र संयोजक विवेक कुलकर्णी, पश्‍चिम महाराष्ट्र संयोजक नीतीन महाजन, प्रांत धर्माचार्य सहसंपर्क प्रमुख नागनाथ बोंगरगे, विभाग सहमंत्री विजयकुमार पिसे, संयोेजक ऋषीकेश चव्हाण, विभाग विशेष संपर्क प्रमुख पुरुषोत्तम उडता, जिल्हा मंत्री संजय जमादार, सहमंत्री बाबू गिरगाल, जिल्हा कोषाध्यक्ष हितेश माधू, बजरंग दल जिल्हा संयोजक सिद्राम चरकूपल्ली, सहसंयोजक नागेश बंडी, जिल्हा धर्मप्रसार प्रमुख जयदेव सुरवसे, सहप्रमुख रवी बोल्ली, गोरक्षक प्रमुख प्रशांत परदेशी आदी उपस्थित होते. विवेक कुलकर्णी आणि नीतीन महाजन यांनी मनोगत व्यक्त केले. तसेच त्यांच्या हस्ते बजरंगींना त्रिशूळ दीक्षा देण्यात आली. सिध्देश्‍वर मंदिरात बजरंग दलाची सामूहिक प्रार्थना आणि महाआरती झाली. गणवेशधारी बजरंगी, हातात भगवे ध्वज, दंड आणि जय श्रीरामच्या घोषणा तसेच संचलन मार्गावर डॉ. आंबेडकर, नेताजी सुभाषचंद्र, स्वातंत्र्यवीर सावरकर यांचाही जयघोष करण्यात आला, शौर्य गीताच्या तालावर संचलन मार्गस्थ होत होते. यावेळी उपस्थित नागरिकांनी पुष्पवृष्टी करून शौर्य संचलनाचे स्वागत केले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow