कासेगाव - उळेगाव मार्गावर ५०० झाडांचे वृक्षारोपण

मुख्यमंत्री फडणवीस वाढदिवस व लोकरत्न कै. श्रीकांत (बप्पा) वाडकर स्मृतीनिमित्त विविध उपक्रम

Jul 25, 2026 - 01:12
 0  1
कासेगाव - उळेगाव मार्गावर ५०० झाडांचे वृक्षारोपण

कासेगाव : मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस  वाढदिवस तसेच कासेगावचे माजी सरपंच व माजी पंचायत समिती सदस्य लोकरत्न कै. श्रीकांत (बप्पा) वाडकर यांच्या ३० व्या पुण्यतिथीनिमित्त लोकरत्न कै. श्रीकांत (बप्पा) वाडकर प्रतिष्ठानच्या वतीने विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.
    कासेगाव–उळे मार्गावर ५०० वृक्षांचे रोपण आ. श्री. सचिन (दादा) कल्याणशेट्टी व श्री. संभाजी जाधव यांच्या हस्ते यावेळी करण्यात आला. प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा कासेगावचे लोकनियुक्त सरपंच श्री. यशपाल (भैया) श्रीकांत वाडकर यांनी प्रास्ताविक केले. कै. श्रीकांत (बप्पा) वाडकर यांच्या सामाजिक व राजकीय कार्याचा गौरवपूर्ण आढावा घेत गावाच्या सर्वांगीण विकासासंदर्भात आ. सचिन कल्याणशेट्टी यांना निवेदन सादर केले.
     यानंतर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते कै. श्रीकांत (बप्पा) वाडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. कासेगाव जिल्हा परिषद शाळेतील ITS प्रज्ञाशोध परीक्षेत यश संपादित ११ गुणवंत विद्यार्थ्यांचा स्मृतिचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला. तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या गावातील तरुणांचाही सन्मान झाला. लक्ष्मण भोजने (रुग्णसेवा), प्रांजल शंकर चौगुले (शैक्षणिक), प्रज्वल शाम जोशी (शैक्षणिक), मेघराज पंडित सरसंबे (क्रीडा) आणि सिद्धार्थ चंद्रकांत कुलकर्णी (शैक्षणिक) यांचा समावेश होता. याप्रसंगी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचा सुमारे १०० ग्रामस्थांनी लाभ घेतला. तसेच आयुष्मान भारत योजनेअंतर्गत ५ लाख रुपयांच्या मोफत आरोग्य संरक्षणासाठी कार्ड नोंदणी व वितरण, तसेच NCMC एस.टी. सवलत कार्ड नोंदणी शिबिरालाही नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कुलश्रेष्ठ महिला बचत गटाच्या वतीने महिलांना ११०० रोपांचे वाटप करण्यात आले.


    भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष श्री. महेश बिराजदार यांनीही मार्गदर्शन केले. त्यानंतर आमदार श्री. सचिन  कल्याणशेट्टी यांनी आपल्या मनोगतात मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली मतदारसंघातील सुमारे ८० टक्के रस्त्यांची कामे पूर्णत्वास आल्याचे सांगितले. उर्वरित रस्ते तसेच शेतकऱ्यांसाठी आवश्यक असलेल्या पाणंद रस्त्यांची कामेही लवकरच पूर्ण करण्यात येतील, अशी ग्वाही दिली.
    यावेळी प्रमुख उपस्थित म्हणून मा. आमदार श्री. सचिन (दादा) कल्याणशेट्टी, भाजयुमो जिल्हाध्यक्ष श्री. महेश बिराजदार, गंगेवाडीचे सरपंच श्री. प्रशांत जाधव, उळेच्या सरपंच सौ. अंबिका कोळी, श्री. संभाजी जाधव, मधुकर चिवरे, मुळेगावचे उपसरपंच श्री. शिवराज जाधव, मल्लिनाथ येणगुरे, विलास वाडकर, उपसरपंच श्री. शहाजहन शेख, ज्ञानेश्वर रोकडे, जालिंदर गायकवाड, सत्यपाल वाडकर, प्रकाश हेडे, गुरु काटकर, विठ्ठल ढेकळे, बालाजी चौगुले, शिवपाल वाडकर, राजश्री येणगुरे, रवी रोकडे आदी मान्यवर उपस्थित होते.
    कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. संदीप क्षीरसागर यांनी केले, तर श्री. ज्ञानेश्वर कदम यांनी आभार मानले. या प्रसंगी कै. श्रीकांत (बप्पा) वाडकर यांच्यावर प्रेम करणारे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow