अब तक 56 ते 65; महाराष्ट्रात सर्वाधिक काळ देवेंद्रच!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 56 व्या वाढदिवसानिमित्त विशेष लेख. 'अब तक 56' या संकल्पनेतून त्यांच्या नेतृत्वाचा, राजकीय प्रवासाचा आणि महाराष्ट्राला पुढील अनेक वर्षे नेतृत्व लाभावे, या शुभेच्छांचा वेध.

Jul 22, 2026 - 16:27
Jul 22, 2026 - 16:28
 0  32
अब तक 56 ते 65;  महाराष्ट्रात सर्वाधिक काळ देवेंद्रच!

अब तक 56.. देशात 56 या आकड्याची नेहमीच चर्चा रंगते. प्रधानमंत्री मोदी यांच्या बाबत 56 इंच छाती. त्यांच्याशी तुलना कोणत्याच नेत्याची होऊ शकत नाही. विरोधक देखील 56 शी कुठेच जुळत नाहीत. अब तक 56 अबाधित आहे. महा-राष्ट्राचे देवभाऊ योगायोगाने अब तक 56 झाले आहेत. त्यांचा आज 22 जुलै रोजी 56 वा वाढदिवस. वाढदिवसानिमित्त लक्ष्यवेध न्यूज परिवारतर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मन:पूर्वक शुभेच्छा!

   देवाभाऊ यांना केवळ शुभेच्छा पुरेशा नाहीत. तर हा 56 आकडा उलट केला तर 65 होईल. म्हणजे पुढील दहा वर्षे देवा भाऊच महा-राष्ट्राचे नेतृत्व करावेत, अशा मनोमन शुभेच्छा!!

    देवेंद्र फडणवीस आणखी दहा वर्षे मुख्यमंत्री राहिले तर सर्वाधिक काळ मुख्यमंत्री हा विक्रम कायम अबाधित राहील. वसंतराव नाईक सलग ११ वर्षे मुख्यमंत्री होते, त्यानंतर विलासराव देशमुख ७ वर्षे होते. यापूर्वी तिसरा क्रमांक होता शरद पवारांचा होता. देवाभाऊ यांनी पवार साहेबांना देखील आता मागे टाकले आहे. २०२४ ते २०२९ हा कार्यकाल पूर्ण झाला तर फडणवीस विलासराव यांना देखील मागे टाकतील. २०२९ नंतरचा कार्यकाळ पाहिला तर तेव्हा ५८ वर्षांचे देवाभाऊ पुन्हा पुढची टर्म पार करण्यास सज्ज होतीलच. त्यामुळे अब तक 56 ते 65 असा देवाभाऊ यांचा प्रवास व्हावा, अशी मनोमन शुभेच्छा!!!

मी पुन्हा येणार, हा आत्मविश्वास देवाभाऊ यांचा आहेच.

   देवेंद्र फडणवीस शतायुषी होवोत, त्यांना उत्तम आयुरारोग्य लाभो, अयोध्यापती श्री प्रभु श्रीराम चरणी प्रार्थना

विजयकुमार पिसे, 

संपादक लक्ष्यवेध

विभाग मंत्री, विहिंप प.महाराष्ट्र प्रांत

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow