परिवाराची प्रयोगशाळा...
गुजरात भाजपाचा आयाराम भाजपायींना मुँहतोड जबाब
चाय पे चर्चा : विजयकुमार पिसे
गुजरात ही संघ परिवाराची प्रयोगशाळा आहे, अशी टीका भाजपा विरोधक करतात. त्यांच्या टीकेत कितपत तथ्य आहे, हे माहीत नाही. काही उदाहरणं काय सांगतात. यापैकीच आणखी एक चांगलं उदाहरण...
पक्ष कार्यालयातील शिपायाची जशी चर्चा होते आहे, तसाच आणखी एक अनुभव कार्यालयमंत्री बाबत आला आहे. संघटनेतील अनेक चेहर्यांना निवडणुकीच्या रिंगणात संधी देताना जिल्हा भाजपा कार्यालय मंत्री जयेश प्रजापती यांची दखल घेतली आहे. प्रजापतींच्या पत्नी नयना प्रजापती यांनाही पक्षाने निवडणूक रिंगणात उभे केले आहे. त्यामुळे निष्ठावान आणि प्रामाणिक कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दुणावला आहे.
काही बड्या नेत्यांकडून आपल्या कुटुंबियांना तिकीट मिळावं यासाठी तिथे जोरदार फिल्डींग लावली होती, पण दबाव डावलून चहा पाजणार्याला आणि कार्यालय मंत्र्यांच्या कुटुंबियास भाजपनं संधी देऊन गुजरात प्रदेश आणि स्थानिक जिल्हा भाजपाने विरोधकांना आणि पक्षातील आयाराम भाजपायींना देखील मुँहतोड जबाब दिला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेकदा स्वत:ची ओळख चहावाला अशी सांगतात. आता मोदींच्याच भाजपाने त्यांच्या होमपीचवर चहा पाजणार्या व्यक्तीला निवडणुकीचे तिकीट दिले आहे. रमेश भील आणि नयना प्रजापती या सामान्य कार्यकर्त्यांच्या विजयासाठी ताकद पणाला लावली आहे. पक्षाचे बडे नेते देखील जोरदार प्रचार करत आहेत.
हे आहे निष्ठेचं फळ...
सोलापुरात असा अनुभव आला का? काँग्रेसी भाजपायी नेत्यांच्या हातातच सूत्रे दिल्यानं, पूर्व कार्यालयमंत्री *प्रक़ाश म्हंता, *सुनील टोणपे आणि *श्रीहरी म्याकल हे बेदखल कार्यालयमंत्री. अशीही काही उदाहरणं समोर आहेत. (इथे स्थानिक) *हे आहे निष्ठेचं फळ.
What's Your Reaction?