चहा विकणारा पंतप्रधान आणि चहा देणारा शिपाई
निष्ठेचं फळ म्हणजे निवडणुकीचे तिकीट, भाजपाचा 46 वर्षांचा प्रवास आणि 28 वर्षे निरपेक्ष सेवा
चाय पे चर्चा : विजयकुमार पिसे
चहा विकणारा पंतप्रधान होऊ शकतो, भाजपाच्या 46 वर्षांच्या प्रवासातील हा अनुभव. असाच आणखी एक अनुभव गुजरातमध्येच आला आहे. 28 वर्षे निरपेक्ष सेवा करणार्या पक्ष कार्यालयातील चहा देणार्या एका शिपायाबाबत घडला आहे. "पार्टी विथ डिफरन्स" म्हणतात ते हेच. निष्ठेचं फळ म्हणजे रमेश भील या शिपाई कर्मचार्याला मनपा निवडणुकीत तिकीट दिलं आहे, इतकेच नव्हे तर तो निवडून यावा म्हणून यंत्रणाही सक्रिय झाली आहे.
भाजपात घराणेशाही नाही. मात्र काँग्रेसी परंपरेची घराणेशाही काही प्रमाणात रूढ होते आहे, त्यामुळे *काँग्रेसमुक्त ऐवजी *काँग्रेसयुक्त अशी प्रतिमा, अशी टीकादेखील होते. अपवाद मेहसाणा येथील. त्यामुळे त्याची चर्चा देखील आणि *गुड न्यूज म्हणून दखल घेणे क्रमप्राप्त आहे. मेहसाणा भाजप कार्यालयात गेल्या 28 वर्षांपासून शिपाई म्हणून काम करणार्या रमेश भील या निष्ठावान कार्यकत्याला निवडणुकीचं तिकीट दिलं आहे. या ठिकाणी एप्रिलच्या अखेरीस मतदान होणार आहे. भीलसाठी भाजपने कंबर कसली आहे. रमेश भील चहा देण्याचे आणि कार्यालयाची देखरेखीचे काम पाहतात. निरपेक्ष भावनेनं तब्बल अडीच दशक ते काम करतात. भाजपच्या उमेदवारांची यादी पाहिली तेव्हा अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. प्रभाग क्रमांक 13 मधून भाजपनं रमेश भील यांना संधी दिली. पक्षानं आपल्या निष्ठेची घेतलेली दखल पाहून रमेश भील यांना देखील गहिवरुन आलं.
What's Your Reaction?