सोयीस्कर राजकीय प्रेम..
बसवेश्वर जयंतीनिमित्त झालेल्या कार्यक्रमातून राजकारणातील ‘सोयीस्कर प्रेम’ पुन्हा समोर आले. भाषणांतील स्तुती, जाहिरातीतील निवडक चेहरे आणि वास्तवातील राजकीय इतिहास यामधील विरोधाभास स्पष्ट झाला. सध्याच्या राजकारणात नाती ही तत्त्वांपेक्षा परिस्थितीनुसार बदलतात, हेच या निमित्ताने दिसून आले.
विजयकुमार पिसे
अस्सल राजकारण्यांचे सोयीस्कर असते. म.बसवेश्वर जयंती निमित्त बहुतेक सर्वच वर्तमाना(पत्रा)त भूतकाळातील एका आमदार महाशयांची भलीमोठी जाहिरात पहायला मिळाली. कोंतम चौकातील (आताचे म.बसवेश्वर सर्कल) जयंती सोहळ्यात स्तुतीपर भाषणे सुरू होती. समस्त बसवभक्त स्तुतीपाठकांना आवरा. आम्हाला दर्शन घेऊ द्या, असे कुजबुजले. मनपा अधिक़ार्यांनी कार्यतत्परतेने पुतळा उभारला. लोकप्रतिनिधींकडून सुशोभिकरणाला भरगच्च निधी मिळाला. भाषणातून कौतुक सुरूच होते. पण पुतळ्याला जेसीबीने हार घालताना उडालेली कसरत, धांदल आणि झालेली गडबड याचीही कुजबूज होती. तत्परता म्हणून संबंधित मनपा सि.इं.अधिकार्याचा सत्कार पार पडला.
भूतकाळातील आमदार महोदय भाषणातून तात्यांची आठवण पुन्हा पुन्हा सांगत होते. आमचे तात्यांशी राजकीय सौख्य कसे होते. असे रसभरीत वर्णन करत महापौर नातू आणि आमदार यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देखील मारली. उपस्थित नागरिक चमकले. कारण हे नेते अस्सल राजकारणी होते. अन्यथा तात्यांचे महेश अण्णा एकदा नव्हे तर दोन वेळा आमदारकीच्या निवडणुकीत इथून पराभूत झालेच नसते.
राजकीय सोयीस्कर प्रेम म्हणजे त्या दिवशीच्या वर्तमानात पूर्वाश्रमीचे काँग्रेसी पण आताचे भाजपायी नेत्यांचेच फोटो झळकत होते. सोलापुरातून अनेकवेळा निवडून आलेले विद्यमान दोन आमदारांचे फोटो टाळले होते. पण या दोन आमदारांनीच एकदा नव्हे तर अनेकदा अनेक भल्या भल्या काँग्रेसी नेत्यांना चीतपट केले आहे. हे तितकेच खरे. शेवटी सोयीस्कर प्रेम म्हणजे काही खरं नसतंय!
What's Your Reaction?