परदेशी लगे रहो...

सोलापूरच्या १३७८ कोटींच्या पाणीपुरवठा योजनेवरून चर्चा आणि शंका वाढत आहेत. सहा महिन्यांत खर्च ८९२ कोटींवरून १३७८ कोटींवर गेल्याने विरोधक आक्रमक झाले असून नागरिकांमध्ये अस्वस्थता आहे. या योजनेमागे प्रशासकीय गरजेसोबतच भविष्यातील राजकीय समीकरणांचीही चर्चा रंगत आहे. २०२९ च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हालचाली सुरू असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Apr 26, 2026 - 09:48
 0  70
परदेशी लगे रहो...

विजयकुमार पिसे
  देवाभाऊंचे विश्‍वासू अधिकारी प्रवीणसिंह परदेशी आपल्या गावचे सुपुत्र. मंत्रालयातून आपल्या गावासाठी लगे रहो.., असाच विचार करत असतात. सोलापूरची १३७८ कोटींची अभिनव पाणी पुरवठा योजनेची उलटसुलट चर्चा थांबण्याचे नाव घेत नाही. का? तर स्मार्ट सिटी योजनेतून दुहेरी जलवाहिनी झाली,तरीही मनपा आठवड्यातून एकदाच देते पाणी. सहा महिन्यापूर्वी ८९२ कोटींची हीच योजना तयार होती. आता ती चक्क १३७८ कोटींपर्यंत फुगली. म्हणजे पाण्यासारखा पैका खर्च केला काय, स्मार्ट योजना झाली काय?  मनपाची आहे पाणीगॅरंटी? यामुळे राजकीय विरोधक आणि सूज्ञ जनता साशंक नव्हे तर अस्वस्थ आहेच. विरोधक आक्रमक. कुठं तरी पाणी मुरतंय, हा गंभीर आरोप. असो. 
सिरीयसली सांगायचं झालं तर प्रवीणसिंह परदेशी यांच्यासाठी ही योजना जिव्हाळ्याची. आणि जमलं तर राजकीय बस्तानही बसवायचंय. गत निवडणुकीत देवाभाऊंनी धाराशिवमधून लोकसभा लढवावी, म्हणून त्यांना सुचविले होते, परंतु राणादादांनी असेल *उपरा तर बसेल फटका, असे सांगून टोलवले म्हणे. अन्यथा एक आयएएस अभ्यासू अधिकारी खासदार म्हणून प्रवीणसिंह परदेशी लोकसभेत दिसले असते. तसा राणादादांना मतदारांनी फटका दिलाच. आपल्या सौ.ना हातात घड्याळ बांधून मैदानात उतरविले. डॉ.पद्मसिंहांच्या बालेकिल्ल्यात ओमराजेंनी शेवटी ठाकरेंची मशाल पेटविलीच. परदेशी वा राणादादा दोघांनाही हुलकावणी मिळाली.
   लगे रहो..,चे समजलेले आणखी एक कारण म्हणजे २०२९ मध्ये सोलापूर लोकसभा ओपन होणार आहे. आतापासूनच आपल्या गावात पाणी लागतंय का, याची ही चाचपणी. देवाभाऊंचे विश्‍वासू आणि कृतीशील प्रशासकीय अधिकारी म्हणून येत्या दोन तीन वर्षात अनेक मोठ्या योजना येतील/आणतील आणि खर्‍या अर्थाने सोलापूरचे दैन्य संपेल, अशी आशा करायला काय हरकत. तर मग परदेशी लगे रहो,अशा शुभकामना॥  

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow