सोलापूर: जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्रचार्यजी महाराज-नाणीज धाम यांच्या प्रेरणेने "एक भक्त एक वृक्ष" या पर्यावरण संरक्षणाच्या संकल्पनेतून १५ दिवसात संपूर्ण भारतभर भव्य वृक्षारोपण अभियान राबविण्यात आले.
या अभियानाच्या माध्यमातून सोलापूर शहर व जिल्ह्यामध्ये १२५७१ झाडे लावण्यात आली तर संपूर्ण भारत देशामध्ये सहा लाख अठरा हजार नऊ (६१८००९) इतकी झाडे लावून एक मोठा विक्रम करण्यात आला.
सोलापूर परिसरात बाळूमामा मंदिर बेलाटी, स्वामी नारायण गुरुकुल प्रशाळा कुंभारी, हिरज,मार्डी, पाथरी,बीबी दारफळ, नान्नज, विडी घरकुल आदि ठिकाणी झाडे लावण्यात आली. यावेळी लोकप्रतिनिधी शिक्षक आदी उपस्थित होते.
या अभियान दरम्यान शहर प्रमुख दिगंबर आवताडे, महिला अध्यक्ष सौ. ऐश्वर्या उत्तरकर, युवा प्रमुख विनायक कांबळे, दादासाहेब नागटिळक, बाळू कदम निखिल मठे, विजय गाडे, विशाल चव्हाण, सुधाकर फंड, मोहिते बुवा यांनी परिश्रम घेतले. ही माहिती प्रमुख संयोजक अमर दुधाळ यांनी दिली.