प्रभू श्रीराम आणि श्री स्वामी समर्थ यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान

ज्ञानेश महाराव यांची बाष्फळ बडबड संभाजी ब्रिगेडच्या अधिवेशनात महाराव यांची मुक्ताफळे, जाणते राजे शरद पवार आणि कोल्हापूरचे खासदार छत्रपती शाहू महाराज यांची उपस्थिती, पण या नेत्यांचे मौन संतापजनक

Sep 12, 2024 - 14:36
Sep 12, 2024 - 16:29
 0  91
प्रभू श्रीराम आणि श्री स्वामी समर्थ यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान

अक्कलकोट : श्रीक्षेत्र अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराज यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी करून धार्मिक भावना दुखावल्या आहेत. तसेच श्रीरामाविषयी अपशब्द वापरले, त्यामुळे पत्रकार ज्ञानेश महाराव यांच्यावर कायदेशीर गुन्हा दाखल करून कडक कारवाई करणेसाठी अक्कलकोट येथे विविध सामाजिक संघटना, राजकीय पक्षांकडून निवेदन देण्यात आले.

     त्यामध्ये असे म्हटले आहे की, २२ रोजी विष्णुदास भावे नाट्यगृह, वाशी येथे संभाजी ब्रिगेडचे अधिवेशनात पत्रकार ज्ञानेश महाराव यांनी , महापुरुषांविषयी आक्षेपार्ह भाषण केले. यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील श्रीराम व स्वामी भक्तांमध्ये धार्मिक भावना दुखावल्या आहेत. सकल हिंदू समाजाकडून ज्ञानेश महाराव यांच्यावर कायदेशीर गुन्हा दाखल करून कडक कारवाईची मागणी करण्यात आली आहे.

   सदरचे निवेदन उपविभागीय पोलीस अधिकारी विलास यामावर, पोलीस निरीक्षक राजेंद्र टाकणे यांना दिले. याप्रसंगी नागणसुर मठाचे श्रीकंठ शिवाचार्य महास्वामीजीं, अक्कलकोट विरक्त मठाचे बसवलिंग म्हास्वामीजीं, हत्तीकणबस मठाचे प्रभू शांतलिंग म्हास्वामीजीं, आळगी मठाचे वीर शिवलींगेश्वर महास्वामीजीं, राजशेखर शिवाचार्य महास्वामीजी, औज मठाचे रेवणसिद्ध महाराज, गुरुदळी मठाचे माळसिद्ध, महाराज, मैंदर्गी मठाचे नीलकंठ शिवाचार्य महास्वामीजीं, दुधनी मठाचे शांतलिंगेश्वर स्वामी, चिंचोळीचे गुरुबसव महास्वामीजी, हालचिंचोळी मठाचे बेळेसिद्ध महास्वामीजी, कलप्पावाडी मठाचे शिवसिद्ध महाराज, शिरवळ मठाचे सोमनिंग महाराज, स्वामी समर्थ समाधी मठाचे अणु महाराज,अनुप महाराज पुजारी, धनंजय महाराज, जेऊर मठाचे पांडुरंग महाराज,शिवपुरीचे डॉ पुरुषोत्तम राजीमवाले, मंदार महाराज, यांच्या मार्गदर्शनाखाली व आ.सचिन कल्याणशेट्टी, यांच्या नेतृत्वाखाली निषेध व्यक्त करण्यात आला.

     यावेळी जन्मजेयराजे भोसले(महाराज), शामराव मोरे, संजय देशमुख, अविनाश मडीखांबे,महेश हिंडोळे, दिलीप सिद्धे,सुनील गोरे, प्रशांत लोकापुरे, शिवशरण जोजन, रमेश कापसे, राजकुमार मसुती, मिलन कल्याणशेट्टी, नागराज कुंभार, सुनील बंडगर, ऍड विजय हर्डीकर,यशवंत धोंगडे, राजशेखर हिप्परगी, शिवलिंग स्वामी, शिवराज स्वामी, अप्पू पराणे, राजू झिंगाडे, प्रदीप पाटील, गजानन पाटील, दत्ता माडेकर, लाला राठोड, दयानंद बिडवे, बसवरज बिराजदार, सिद्धाराम टाके, उपसरपंच लाला राठोड, राजू पुकाळे,बालाजी पाटील, महेश शावरी उपस्थित होते. दरम्यान 

अक्कलकोट पोलीस ठाण्यात महाराज यांच्या वादग्रस्त वक्तव्याबद्दल त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याची फिर्याद प्रथमेश विजय पवार यांनी दिली आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow