प्रभू श्रीराम, स्वामी समर्थांच्या अवमानाचा भाजपतर्फे निषेध
प्रभू श्रीराम, स्वामी समर्थांच्या अवमानाचा भाजपतर्फे निषेध

सोलापूर : संभाजी ब्रिगेडच्या कार्यक्रमात प्रभू श्रीराम, स्वामी समर्थांचा अवमान झाल्याचा निषेध भारतीय जनता पक्षातर्फे करण्यात आला.
हिंदूंचे आराध्य दैवत प्रभु श्रीराम तसेच श्री स्वामी समर्थ महाराजांचा अवमान पत्रकार ज्ञानेश महाराव यांनी आपल्या भाषणात केला. त्या कार्यक्रमात स्टेजवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व खा. शाहू महाराज उपस्थित होते, त्यांनी कुठलाही आक्षेप घेतला नाही. अशा जातीयवादी,हिंदू धर्मविरोधी मानसिकतेचा भाजपच्यावतीने दत्तनगर येथे जाहीर निषेध करण्यात आला. भाजप शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.
प्रभू श्रीराम,श्री स्वामी समर्थ यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य करणाऱ्यांना सद्बुद्धी देण्याचे साकडे घालण्यात आले. याप्रसंगी माजी महापौर श्रीकांचना यन्नम, युवा मोर्चा प्रदेश सरचिटणीस वृषाली चालुक्य, अक्षय अंजीखाने, सरचिटणीस विशाल गायकवाड, उपाध्यक्ष जय साळुंखे, भूपती कमटम, प्रशांत फत्तेपूरकर, चिटणीस नागेश सरगम, अनिल कंदलगी, बजरंग कुलकर्णी, दत्तात्रय पोसा, माजी नगरसेवक मेघनाथ येमुल, देवेंद्र कोठे, वैभव बिराजदार, मनोज कलशेट्टी, जाकीर सगरी, आनंद बिरू, अंबादास बिंगी, रामचंद्र जन्नू ,राजशेखर येमुल, नरेश पतंगे, विजय इप्पापाकाल, गिरीश बत्तुल, किरण भंडारी, राम वाकसे, सतीश महाले, राहुल घोडके, विशाल धोत्रे, विजय महिंद्रकर, धीरज कुंभार, शावर कोंडा, प्रकाश गाजुल आदी उपस्थित होते.यावेळी या शरद पवार यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
What's Your Reaction?






