धसका....
टीव्ही चॅनलचा टीआरपी कुणी वाढवला असेल तर आष्टीचे भाजपा आमदार सुरेश धस यांचे नाव पुढे येईल. पंकजा मुंडे यांनी परवा दिलेल्या मुलाखतीत कॅमेरे सोबत घेऊन फिरता...असा उल्लेख केला होता. त्यांचा धसका किती हे उगीच नाही सांगत चॅनलवाल्यांचा टीआरपी.

(विजयकुमार पिसे)
टीव्ही चॅनलचा टीआरपी कुणी वाढवला असेल तर आष्टीचे भाजपा आमदार सुरेश धस यांचे नाव पुढे येईल. पंकजा मुंडे यांनी परवा दिलेल्या मुलाखतीत कॅमेरे सोबत घेऊन फिरता...असा उल्लेख केला होता. त्यांचा धसका किती हे उगीच नाही सांगत चॅनलवाल्यांचा टीआरपी. धस यांचे आणखी एक वैशिष्ट्य... त्यांना ज्यांनी साथ दिली, त्यांच्यावर कधीही उलटतील. गोपीनाथ मुंडे यांनी त्यांना आमदार केलं. पुढे गोपीनाथरावांविरुध्द हेच शस्त्र शरद पवारांनी चालवलं. 2014 ची बीड लोकसभा त्यांनी लढवली. मुंडे जिंकले. पण त्यांची दमछाक झाली. पंकजाताईनी धाराशिव,बीड, लातूरमधून त्यांना विधान परिषदेवर निवडून आणलं. यंदा आष्टीमधून पुन्हा आमदार झाले. यावेळीही त्यांना पंकजाताईंची मदत झाली असेलच. आमच्या पंकुताई असा उल्लेख त्यांनी चॅनलला बाईट देताना केला तरी धसका लागतो. मस्साजोग प्रकरण समोर आलं तेव्हा बीडचे आका हा शब्दप्रयोग सर्वप्रथम धस यांनीच केला. तेव्हा पंकजातार्ई यांचेकडे अनेकजण संशयाने पाहू लागले. कारण कळत न कळत टोन आक्का असाच होता. हा धसका. राजकारणात लागणारे गुण ज्याच्याकडे तो सर्वांनाचा पुरून उरतो, असं म्हणतात. बीड जिल्ह्याचं राजकारण बेमिसाल. मुंडे साहेबांचा विधानसभेत एकदा पराभव झाला, तो त्यांनी पचवला. नंतरच्या काळात त्यांनी रजनीताई पाटील, जयसिंगराव पाटील यांना मोठं केलं. खासदार म्हणून निवडून आणलं. धनुभाऊ यांची सुरुवात विधान परिषदेतूनच केली. परळीतून पंकजा पहिल्यांदा निवडून आल्या, अनेकांना ते रुचलं नाही. आणि पुढे राजकारणही बदलले. धस यांची जरांगेंशी दोस्ती, तशी मुंडे परिवाराशी कुस्ती तसेच बावनकुळे यांच्या मध्यस्थीने धनंजय मुंडे यांंची भेट हे कौशल्य. अनेकदा अपयश पाहिलेले बजरंग सोनवणे पंकजातार्ईंचा पराभव करतात तसे आश्चर्यच. त्यामुळे बीडचे राजकारण किती टोकदार हे लक्षात येईल. त्यात भर पडली खोक्याची. संजय रौतांमुळे आधीच खोके बदनाम. आता हा नवा खोका म्हणजे बीडसाठी धसका.
(बुरा न मानो होली है)
What's Your Reaction?






