सर्व बावन्न पत्ते यांच्याच हातात....अन् कार्यकर्ते?

सामान्य कार्यकर्त्यांना याचा धसका. प्रामाणिक कार्यकर्त्यांची झोळी रिकामीच. त्यांनी फक्त काम करायचं. आणि पक्षासाठी राबायचं. सगळे बावन्न पत्ते यांच्याच हातात...। समस्त कार्यकर्त्यांना मात्र?

Mar 14, 2025 - 00:00
Mar 14, 2025 - 00:27
 1  428
सर्व बावन्न पत्ते यांच्याच हातात....अन् कार्यकर्ते?

(विजयकुमार पिसे)

2019 च्या विधानसभा निवडणुकीत प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादांनी अनेकांचे पत्ते कापले. त्यात चंद्रशेखर बावनकुळे    यांचेही. यथावकाश प्रदेशाध्यक्ष आणि विधान परिषदेवर त्यांना संधी. असा दुहेरी लाभ. 2025 मध्ये यांनी देखील काही पत्ते कापले. विधानसभेचं तिकीट. पाठोपाठ महसूलमंत्री. मुख्यमंत्र्यांनंतरचे दुसर्‍या क्रमांकाचे हे खाते. शिवाय दोन दोन जिल्ह्यांचे पालकमंत्री. तरीही प्रदेशाध्यक्षपदावर बावनकुळेच. एकाचवेळी संघटना, सरकार/प्रशासन आणि दोन ठिक़ाणी पालकमंत्री म्हणजे स्थानिक प्रशासन आणि तेथील कार्यकर्त्यांच्या वरच. याला म्हणतात कौशल्य. म्हणजे बावनकुळे नशीबवानच. शिवाय पक्षाचाही  मोठा विश्‍वास! वास्तविक भाजपात दुहेरी लाभाचं पद नसतं असं म्हणतात. काही अपवादही. तत्कालिन सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण आता कार्याध्यक्ष. पण नामधारीच दिसतात. त्यांना पदाची जबाबदारी दिली. पण काम जबाबदारीचं नाही. रावसाहेब दानवे यांनी कोटी सदस्यसंख्येचं टार्गेट केलं होतं. मधल्या काळात चंद्रकांतदादांचं काही टार्गेटच नव्हतं. ते सोलापूरचे पालकमंत्री होते, पण कार्यकर्त्यांच्या बैठक़ा, आणि त्यांना कामं असं काही अपवादानंच. आताही हीच गती. बावनकुळे यांच्या कार्यकालात दीड कोटी संख्येचं कार्यकर्त्यांना टार्गेट, अन्यथा त्या कार्यकर्त्याचं काही खरं नाही म्हणे. (असं त्यांचे समर्थक म्हणतात.) सामान्य कार्यकर्त्यांना याचा धसका. प्रामाणिक कार्यकर्त्यांची झोळी रिकामीच. त्यांनी फक्त काम करायचं. आणि पक्षासाठी राबायचं. सगळे बावन्न पत्ते यांच्याच हातात...। समस्त कार्यकर्त्यांना मात्र?
(बुरा न मानो होली है)

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow