माधवी लता यांच्या रॅलीने कमळ फुलले!
विश्व हिंदु परिषद लोकजागर अभियानची उपलब्धी : विजयकुमार पिसे
सोलापूर : चुकीच्या व्यक्तीला मतदान केल्यामुळे पुढील पाच वर्षे संपूर्ण समाजाला त्रास होऊ शकतो. देशाच्या शत्रूपासून मुक्त करण्यासाठी देशप्रेमी उमेदवारांनाच विधानसभेत पाठवा, या शब्दात हैदराबाद येथील हिंदू नेत्या माधवी लता यांनी विश्व हिंदू परिषदेच्या लोकजागर अभियानांतर्गत आवाहन केले. पूर्व भागातील माधव नगर आणि जुने विडी घरकुल या दोन ठिकाणी माधवी लता यांचे जाहीर सभेचे आयोजन केले होते.विश्व हिंदू परिषद आयोजित लोकजागर अभियानाचे आयोजन केले होते. माधवी लता यांच्या या अभियानामुळे सोलापुरात भाजपाचे कमळ फुलले.
विश्व हिंदू परिषदेचे लक्ष्मण महाराज चव्हाण, विभाग संपर्कप्रमुख पुरुषोत्तम उडता, विहिंप विभाग सहमंत्री विजयकुमार पिसे (पत्रकार), कोषाध्यक्ष हितेश माधु, जिल्हा मंत्री संजय जमादार, जिल्हाध्यक्ष ह.भ.प. अभिमन्यू महाराज डोंगरे व्यासपीठावर उपस्थित होते.
विधानसभा निवडणुकीमध्ये नागरिकांनी 100 टक्के मतदान करावे, राष्ट्रभक्त उमेदवाराला पाठिंबा द्यावा या हेतूने विहिंपतर्फे माधवी लता यांच्या व्याख्यानाचे आयोजन केले होते. मतदानाबद्दल जागृती वाढावी त्यासाठी या व्याख्यानातून प्रबोधन करण्यात आले.
माधवी लता म्हणाल्या. यावेळी शहर मध्यचे भाजप उमेदवार देवेंद्र कोठे यांचा सत्कार करून विजयी भव, असा आशीर्वाद दिला.
धनुष्यबाण मारण्याचा तो प्रसंग अभूतपूर्व जाहीर व्याख्यानावेळी धनुष्यबाण मारण्याचा माधवी लता यांचा अभिनय सर्वत्र लोकप्रिय ठरला आहे. या व्याख्यानाप्रसंगी सोलापूरकरांच्या आग्रहाखातर व्यासपीठावरून त्यांनी धनुष्यबाण मारतानाचा अभिनय करताच उपस्थितांनी एकच जल्लोष केला. हा प्रसंग अभूतपूर्व ठरला.
शहर उत्तरमध्ये भेटीगाठी
शहर उत्तर मतदारसंघात माधवी लता यांनी विडी कामगार महिलांशी संवाद साधला. तसेच चाटला पैठणी या शोरूमला भेट दिली. तिथे भाजपा नगरसेववक डॉ. किरण देशमुख, डॉ.सौ.उर्वशी देशमुख तसेच नगरसेवक शिवानंद पाटील समवेत होते. यावेळी माधवी लता यांनी 'मा विजयअण्णा देशमुख' असे संबोधन करून त्यांना विजय करण्याचे आवाहन केले.
बालाजी सरोवर येथे आगमनावेळी विहिंपचे विभाग सहमंत्री विजयकुमार पिसे, जिल्हा मंत्री संजय जमादार, प्रबोधन मंच प्रमुख विनायक बंकापूर, सदानंद गुंडेटी यांनी माधवी लता यांचे स्वागत केले. सोलापूर शहर व परिसरातील सामाजिक व भाषिक लोकसंख्येविषयी माधवी लता यांना अवगत केले. रॅलीचे नियोजन, सोलापुरातील भेटीगाठी, विरोधी पक्षांची रणनीती व एमआयएमचा प्रभाव याविषयी माहिती घेतली.
What's Your Reaction?