पक्षनिष्ठा पुन्हा हरली! नव भाजपायींना नवरत्नं सापडली नाहीत?
स्वीकृतसाठी फक्त ८ नावे जाहीर, पुन्हा झुलवा,अडीच वर्षच मिळणार संधी! जी दुरवस्था परिवहन उपक्रमाची, तीच गत या समितीची; स्थायी समितीचे १६ सदस्य निश्चित
(विजयकुमार पिसे)
कार्यकर्त्यांसाठी शेवटची संधी, नवभाजपायींची पसंती कोणाला? ९ स्वीकृत सदस्यांच्या निवडीबाबत १७ रोजी लक्ष्यवेधने वृत्त प्रकाशित केले होते, तेच खरे ठरले. यावेळी पुन्हा एकदा पक्षनिष्ठा हरली, नऊपैकी फक्त आठ सदस्यांची घोषणा सभागृह नेते नरेंद्र काळे यांनी केली. तसेच परिवहन उपक्रमाची जी दुरवस्था आहे, तीच गत या समितीच्या सदस्यांची निवड न करता त्यांनी अधोरेखित केली आहे. स्वीकृत आणि परिवहनबाबत *झुलवा कायम ठेवला. मात्र स्थायी समितीचे सर्व१६ सदस्य जाहीर केले. पहिल्याच मनपा सभेत सत्ताधारी पक्षात समन्वय नसल्यामुळे अनपेक्षित (ट्रेलर) राडा सोलापूरकरांना पहावयास मिळाला. नामुष्की देखील झाली. त्यामुळे महापौर विनायक कोंड्याल यांनी श्रध्दांजली वाहून सभा तहकूब केली.
८७ नगसेवक जिंकून प्रच्चंड बहुमत महापालिकेत भाजपाने मिळवले आहे, त्यामुळे विरोधक नामोहरम होतील, ही अपेक्षा *भंग झाली. स्वीकृत सदस्य कोण होणार याची मोठी उत्सुकता होती. पण याबाबत *लक्ष्यवेध न्यूजमधून जो अंदाज वर्तविला होता, त्याची *प्रचिती आली. एकमत न झाल्यामुळे सभा नियोजित वेळेत सुरू झाली नाही. स्वीकृत सदस्य निवडीचा विषय आल्यानंतर नरेंद्र काळे यांनी दिलेल्या सूचनेवर भाजपाचे ९ ऐवजी फक्त आठ सदस्य दिले होते. आणि एमआयएमच एक सदस्य होता. महापौरांच्या डायवसवरून नवनियुक्त सदस्यांची नावे वाचली तेव्हा दहा नावे घोषित झाले नाहीत, हे लक्षात आले. हा गौडबंगाल विरोधी पक्षांचे चेतन नरोटे (काँग्रेस) आणि अमोल शिंदे (शिंदेसेना) यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी हरकत घेतली. त्यावरून प्रचंड गोंधळ सुरू झाला. या दरम्यान घोडके नामक एक कार्यकर्ता आपले नाव स्वीकृतसाठी घेतले नाही तर आत्मदहन करू, असा इशारा देत सभागृहाकडे धावून आला. यावेळी सभेवर नियंत्रण होत नाही हे लक्षात येताच श्रध्दांजली वाहून सभा तहकूब झाली.
स्वीकृत सदस्य म्हणून पुढील नऊ सदस्यांची निवड जाहीर करण्यात आली. यामध्ये शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर, उपाध्यक्ष श्रीनिवास दायमा, माजी सरचिटणीस रुद्रेश बोरामणी, महावीर बँकेचे संचालक ज्ञानेश्वर म्याकल. तसेच अक्षय अंजिखाने, वृषाली चालुक्य, अॅड.ऋषीकेश मेट्रे, पत्रकार मनीष केत आणि एमआयएमचे नय्युम सालार. वर नमूद करण्यात आलेले भाजपाचे ८ पैकी पहिले चार सदस्यच पक्षनिष्ठ असल्याचे काही प्रमुख कार्यकर्त्यांनी सांगितले. त्यामुळे त्यांची प्रतिक्रिया होती, पुन्हा *एकदा पक्षनिष्ठा हरली.(प्र.8,1,4,3). मात्र अनेक निष्ठावंताना डावलण्यात आल्यामुळे खंत व्यक्त होत आहे.
भाजपाकडे पुरेसे बहुमत असूनही राष्ट्रवादीचा एकमेव सदस्य (वैभव हत्तुरे) यांना सोबत घेत युती केली. त्यामुळे नववा सदस्य कोण? याची उत्सुकता होती. हे नाव जाहीर केले नाही, म्हणजे नवभाजपायींना नवरत्नं सापडले नाहीत का?असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. *तसेच संघाकडून काही नावे दिली आहेत, अशी माहिती काही माध्यमकर्मींकडून सांगितली जात होती. प्राप्त माहितीनुसार मनपा निवडणुकीत *संघ परिवाराकडून सुचवलेल्या नावांची *नवभाजपायींनी *दखल घेतलीच नाही. त्यामुळे आता *स्वीकृतबाबत नाव सुचवण्याचा विषयच नव्हता.
स्थायी समितीचे सदस्य : अविनाश पाटील,राजकुमार पाटील, रंजीता चाकोते,बिज्जू प्रधाने,गणेश वानकर, अमर पुदाले,सतीश सिरसिल्ला, सत्यनारायण गुर्रम,कल्पना कदम, भारतसिंग बडूरवाले, शिवाजी वाघमोडे,अश्विनी जव्हाण,संगीता जाधव,जयकुमार माने (सर्व भाजपा) तसेच सेनेचे अमोल शिंदे, एमआयएमचे गाझी जहागिरदार. दरम्यान महापौर कोंड्याल यांनी नंतर पत्रकारांशी बोलताना पुढील सभेत दहावा स्वीकृत सदस्य घेतला जाईल, असे सांगितले. पण नियमानुसार स्वीकृतचा हा विषय मंजूर झाल्यामुळे पुन्हा अजेंडयावर घेण्याचा/येण्याचा वा नियुक्त करण्याचा प्रश्नच नाही, अशी माहिती आहे.
What's Your Reaction?