पालिका ७ विषय समिती सभापती अविरोध,मलाईदार समित्या कुणाला?

प्र.२३मध्ये तीन पदांची लॉटरी, शहर मध्य तीन, उत्तर व दक्षिण सोलापूरला प्रत्येकी दोन सभापती, नवीन चेहर्‍यांना संधी,केवळ औपचारिक निवडणूक प्रक्रिया

Jul 3, 2026 - 00:11
 0  6
पालिका ७ विषय समिती सभापती अविरोध,मलाईदार समित्या कुणाला?

सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेच्या विविध सात विषय समितींच्या सभापतीपदाच्या निवडणुकीसाठी गुरुवारी नगरसचिव प्रवीण दंतकाळेे यांच्याकडे सात उमेदवारी अर्ज दाखल झाल्यामुळे या निवडी अविरोध झाल्या असून निवडणूक प्रक्रियेची केवळ औपचारिकता राहिली आहे. मलाईदार समित्यांवर कुणाला लॉटरी लागली याची चर्चा आहे. तसेच एकाच प्रभागात (प्र.२३ मध्ये)एकाच वेळी तीन घटनात्मक पदे मिळाली आहेत.
   शहर मध्यसाठी तीन, उत्तर व दक्षिण सोलापूर मतदार संघात प्रत्येकी दोन सभापती निश्‍चित केले आहेत. मलाईदार समित्यांसाठी इच्छुक नगरसेवक प्रयत्नशील होते, अशा दावेदारांची निराशा झाली. मात्र ज्या नगरसेवक,नगरसेविकांना साधारण समित्या मिळाल्या आहेत, त्यांनी वर्षभरात याच समित्यांच्या माध्यमातून असाधारण कामगिरी करून दाखवणे, हेच त्यांच्यासमोर खरे आव्हान असेल.
   स्थापत्य समिती सभापती : विजय चिप्पा(प्र.१३), विधी समिती सभापती: सत्यजित वाघमोडे (प्र.२३), वैद्यकीय सहाय्य व आरोग्य समिती सभापती :  सुनील खटके (प्र६), शहर सुधारणा समिती सभापती : स्वाती बडगू (प्र.३),   मंडई व उद्यान समिती सभापती : राजशेखर पाटील, सोरेगाव (प्र.२३) कामगार व समाजकल्याण समिती सभापती : श्रद्धा पवार (प्र.७) तसेच महिला व बालकल्याण समिती सभापती : निर्मला जंगम (प्र.१७) यांनी नगरसचिव कार्यालयात नगरसचिव प्रवीण दंतकाळे यांच्याकडे उमेदवारी अर्ज सादर केले. उपमहापौर ज्ञानेश्‍वरी देवकर, तसेच सत्यजित वाघमोडे आणि राजशेखर पाटील हे तीन नगरसेवक प्र.२३ चे प्रतिनिधित्व करतात. एकाच प्रभागातील तिघांना संधी मिळाली आहे. सभापती पदासाठी उमेदवारी अर्ज सादर करतेप्रसंगी महापौर विनायक कोंड्याल, उपमहापौर ज्ञानेश्‍वरी देवकर, सभागृह नेते नरेंद्र  काळे, शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर व अन्य नगरसेवक, पदाधिक़ारी उपस्थित होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow