आ. सचिनदादा कल्याणशेट्टी यांची निवडणूक प्रमुख जबाबदारीमधून मुक्त करण्याची विनंती ! भाजपा प्रदेशाध्यक्षांकडे सदर विनंती पत्र पाठवले.
आ. सचिनदादा कल्याणशेट्टी यांची निवडणूक प्रमुख जबाबदारीमधून मुक्त करण्याची विनंती ! भाजपा प्रदेशाध्यक्षांकडे सदर विनंती पत्र पाठवले.
(विजयकुमार पिसे)
सोलापूर महानगरपालिका निवडणूक़ प्रक्रिेयेत भाजपामध्ये 24 तासात मोठी उलथापालथ झाली. काल गुरुवारी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी भाजपा निवडणूक प्रमुखपदी आ.सचिन कल्याणशेट्टी यांची नियुक्ती केली होती. पण त्यांच्याकडील अन्य व्यस्त दायित्वांमुळे आ.सचिन दादा कल्याणशेट्टी यांनी या जबाबदारीमधून मुक्त करण्याची विनंती प्रदेशाध्यक्षांकडे केली आहे.
गत 5 नोव्हेंबर रोजी राज्यातील सर्व महापालिका आणि जिल्हा परिषद आणि नगर पालिकांसाठी प्रदेश कार्यालयाने निवडणूक़ प्रमुख आणि प्रभारी यांची नियुक्ती केली होती. त्याप्रमाणे राज्यभरात सर्व दायित्व पदाधिक़ार्यांनी कामकाज सुरू केेले होते. दरम्यान काल गुरुवारी प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी आ.कल्याणशेट्टी यांची सोलापूर महापालिकेसाठी निवडणूक़ प्रमुख म्हणून नियुक्ती केल्याचे पत्र जारी केले होते. आ.कल्याणशेट्टी हे अक्कलकोट मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. शिवाय जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे. त्या पृष्ठभूमीवर आ.कल्याणशेट्टी यांनी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना पत्र पाठवून या जबाबदारीतून मुक्त करण्याची विनंती केली आहे.
उपरोक्त पत्रात आ.कल्याणशेट्टी यांनी पक्षाचे आभार मानले तसेच त्यांनी म्हटले की, सध्याची राजकीय परिस्थिती पाहता महापालिकेसोबतच जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक़ केव्हा ही होउ शकते. त्यामुळे मनपा निवडणूक़ प्रमुख व माझ्या (अक्कलकोट) मतदारसंघातील जि.प. व पं.स. या दोन्ही जबाबदार्यांना पूर्ण क्षमतेने न्याय देउ शकणार नाही. ही वस्तुस्थिती निदर्शनास आणून देत आ.सचिनदादा कल्याणशेट्टी यांनी सोलापूर महापालिका निवडणूक़ प्रमुख पदाच्या जबाबदारीमधून मुक्त करावे, अशी विनंती प्रदेश भाजपाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडे केली आहे. याबाबत आता प्रदेशाध्यक्ष काय निर्णय घेतील, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
दरम्यान रात्री उशीरा आ.कल्याणशेट्टी यांचे सदरचे पत्र लक्ष्यवेध न्यूजकडे प्राप्त झाले. या दरम्यान सोशल मिडियावर चुकीची आणि गैरसमज निर्माण करणारी माहिती व्हायरल झाली होती. यासंदर्भात आ.कल्याणशेट्टी यांच्याशी संपर्क झाला. निवडणूक़ काळात असे मेसेज व्हायरल होत असतात. मी पक्षाकडे यापूर्वीच 15 दिवसांपूर्वी पक्षाच्या बैठक़ीमध्ये आपण सांगितले होते. जि.प.व पं.स.निवडणुका लागल्यानंतर माझी अडचण होईल, म्हणून पक्षाकडे विनंती केली आहे,असे आ.कल्याणशेट्टी यांनी यावेळी नमूद केले.
What's Your Reaction?