विहिंप प्रांत अध्यक्षपदी प्राचार्य धरणे, हस्तिनापूर येथे केंद्रीय बैठक़ीत नियुक्तीची घोषणा
विहिंप प्रांत अध्यक्षपदी प्राचार्य धरणे, हस्तिनापूर येथे केंद्रीय बैठक़ीत नियुक्तीची घोषणा
(विजयकुमार पिसे)
विश्व हिंदू परिषद पश्चिम महाराष्ट्र प्रांत अध्यक्षपदी प्राचार्य श्री. गजानन धरणे यांची नियुक्ती झाली आहे. हस्तिनापूर येथे विहिंप केंद्रीय प्रन्यासी बैठकीत श्री धरणे सर यांच्या नियुक्तीची घोषणा झाली.
मूळचे सोलापूरचे श्री धरणे सर विद्यार्थी दशेपासून संघ स्वयंसेवक असून अभाविपमध्ये अनेक दायित्व त्यांनी सांभाळले आहे. सध्या सोलापुरातील सिध्देश्वर वुमेन्स पॉलिटेक्निक येथे प्राचार्य म्हणून ते कार्यरत आहेत. धरणे यांच्या नियुक्तीने सोलापूरचा सन्मान झाला आहे.
मेरठ प्रांतातील हस्तिनापूर येथे विश्व हिंदू परिषदेच्या केंद्रीय प्रन्यासी मंडल बैठक़ीचा समारोप शुक्रवारी 20 डिसेंबर रोजी झाला. यावेळी अ.भा. स्तरावरील अन्य नियुक्तींच्या घोषणा झाल्या. यावेळी मुंबई क्षेत्र मंत्री रामचंद रामुका, सहमंत्री प्रा.अनंत पांडे, प.महाराष्ट्र प्रांत मंत्री किशोर चव्हाण, सहमंत्री अॅड.सतीश गोरडे, सहमंत्री नीतीन वाटकर,संघटनमंत्री अनिरूध्द पंडित तसेच अन्य पदाधिक़ारी उपस्थित होते.
*नवनियुक्त प्रांत अध्यक्ष प्राचार्य धरणे यांचा परिचय...
श्री. गजानन रेवणसिद्ध धरणे विद्यार्थी दशेपासून संघ स्वयंसेवक आहेत. शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक क्षेत्राशी निगडित अनेक संस्थांमध्ये गेली चाळीस वर्षे सक्रिय आहेत. अभाविपशी आजही ते जोडलेले आहेत. त्यांचे शिक्षण (सोलापूर) इ ए , च् ए (चशलह एपसस) झाले असून यंत्र अभियांत्रिकी विभागात गेली 40 वर्षे प्राध्यापक व गत 16 वर्षापासून श्री सिद्धेश्वर वुमेन्स पॉलिटेक्निक येथे प्राचार्य म्हणून कार्यरत आहेत.
धरणे सर 1980 पासून अभाविपमध्ये सक्रिय आहेेत. प्रारंभी कराड शहर मंत्री, सातारा जिल्हा विस्तारक, सातारा जिल्हा प्रमुख, नंतर सोलापूर शहर अध्यक्ष, 1992 ते 1994 अभाविप महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष. 1993 पासून भटके विमुक्त विकास प्रतिष्ठान महाराष्ट्र प्रदेश सहकार्यवाह, पुढे 2005 ते 2015 पर्यंत प्रतिष्ठानचे कार्यवाह होते. 2010 मध्ये सोलापूर जनता सहकारी बँकेत प्रथम संचालक झाले. 2015 मध्ये त्यांची उपाध्यक्षपदी निवड झाली. याच बँकेचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी यशस्वीपणे धुरा सांभाळली. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ (चशवळलरश्र णपर्ळींशीीळीूं)नाशिक, सिनेट. सदस्य अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, राज्यपाल नियुक्त सिनेट सदस्य महात्मा बसवेश्वर अध्यासन केंद्र सोलापूर विद्यापीठ, हिंदू वीरशैव लिंगायत मंच सोलापूर जिल्हा संयोजक, पश्चिम महाराष्ट्र सहसंयोजक, श्री सिद्धेश्वर शिक्षण मंडळाचे संचालक आहेत.
प्राचार्य श्री गजानन धरणे यांचे विश्व हिंदू परिषद परिवारात स्वागत. त्यांचे मन:पूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा.
: विजयकुमार पिसे, विहिंप विभाग सहमंत्री.
What's Your Reaction?