हेडगेवार रक्तपेढीचा रविवारी रक्तदाता कृतज्ञता सोहळा

35 वर्षे अखंड सेवा, जीवनदायी प्रवासाचा सन्मान! सेवा है यज्ञकुंड...स्नेहभाव आणि सेवाभाव जपण्याची परंपरा

Jul 18, 2025 - 17:17
 0  150
हेडगेवार रक्तपेढीचा रविवारी रक्तदाता कृतज्ञता सोहळा

(विजयकुमार पिसे)

प.पू. सरसंघचालक तथा संघ संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांच्या जन्मशताब्दीत सेवाकार्याचे जाळे देशभर उभारले गेले, अशाच प्रकारचे एक सेवाकार्य सोलापुरात 35 वर्षापूर्वी सुरू झाले. येत्या रविवारी 20 जुलै रोजी डॉ.हेडगेवार रक्तपेढीचा रक्तदाता कृतज्ञता सोहळा होत आहे. अनेक रक्तपेढ्या रक्त(दान) घेतात अनेक प्रकारचे आमिष देऊन; अपवाद डॉ.हेडगेवार रक्तपेढीचा! ही रक्तपेढी गेली 35 वर्षं रक्तदात्यांविषयी कृतज्ञता व्यक्त करते. स्नेहभाव आणि सेवाभाव जपत आली आहे।  

     1989 मध्ये डॉ.हेडगेवार जन्मशताब्दी झाली. तत्कालिन पू.सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांनी संघकार्यात सेवाकार्य हे आयाम जोडले. त्यानंतर अल्पावधीत देशभरात संघाची सेवाकार्ये उभारली गेली, त्यामागे सेवाभावाचे जागरण आहे. याच उदात्त भूमिकेतून 1990 सोलापुरात डॉ.हेडगेवार रक्तपेढीची मुहूर्तमेढ रोवली गेली. रा.स्व.संघ सेवाकार्य विभागाचे अ.भा.प्रमुख डॉ.सूर्यनारायणराव यांच्या हस्ते रक्तपेढीचा शुभारंभ झाला. तेव्हापासून दरवर्षी रक्तपेढीच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून रक्तदात्यांविषयी कृतज्ञता व्यक्त केली जाते. सोलापुरात अनेक नामांकित रक्तपेढ्या कार्यरत आहेत, यापैक़ी कुणी रक्तदात्यांविषयी कृतज्ञता भाव जपणारे उपक्रम केल्याचे कधी ऐकिवात आलेे नाही.

    येत्या रविवारी आयोजित रक्तदाता कृतज्ञता सोहळ्यास डॉ.रमेश पांडव (निमंत्रक सामाजिक समरसता मंच महाराष्ट्र) हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच उद्योजक नित्यानंद दर्बी प्रमुख पाहुणे आणि जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद अध्यक्षस्थानी आहेत. शिवस्मारक सभागृहात स्नेहमेळावानिमित्त रक्तदात्यांसाठी हे नम्र आवाहन....

     #35 वर्ष अखंड सेवा, जीवनदायी प्रवासाचा सन्मान!

रक्तदाता कृतज्ञता समारंभ व स्नेहमेळावा...

सन 1990 पासून ते आजपर्यंत...

डॉ. हेडगेवार रक्त संकलन केंद्र, सोलापूर

हे केवळ एक रक्तपेढीच नव्हे, तर विश्‍वासाचं,

सेवाभावाचं आणि माणुसकीचं प्रतिक बनले आहे.

रात्र असो की दिवस, उत्सव असो की आपत्ती; 24 तास गुणवत्तापूर्ण रक्तपुरवठा, 44 अनुभवी प्रशिक्षित कर्मचारी, तज्ज्ञ डॉक्टरांची टीम, आणि अत्याधुनिक प्रयोगशाळा यासह रुग्णांच्या जीवनासाठी सतत सज्ज! याच कार्यात हातभार लावणार्‍या आपल्या प्रत्येक रक्तदात्याच्या ऋणात आम्ही आहोत. रक्तदान हेच जीवनदान... आणि आपण आहात त्याचे खरे दाते!

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow