भाजपात शॉक ट्रिटमेंट
प्रथमच महिला शहराध्यक्षा, निष्ठावंतांना संधी, तडवळकर, चव्हाण यांना सरचिटणीस पदावरून बढती, सांगोल्याचे केदार कायम, पार्टी विथ डिफरन्स म्हणजे भाजपा

(विजयकुमार पिसे)
राज्यभरातील शहर आणि ग्रामीण अध्यक्षांच्या निवडीत भाजपाने शॉक ट्रिटमेंट दिला आहे. सोलापुरात प्रथमच महिला अध्यक्षांची निवड केली आहे. विद्यमान अध्यक्ष नरेंद्र काळे आणि आ.सचिन कल्याणशेट्टी यांच्या ऐवजी रोहिणी तडवळकर आणि ग्रामीणसाठी शशिकांत चव्हाण (मंगळवेढा) या दोन सरचिटणीसांना प्रमोशन मिळाले आहे. राज्यात अशाच पध्दतीने अध्यक्ष बदलून पक्षाने झटका दिला आहे. आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत स्थानिक पातळीवर कोणी "कारभा(र)री" करू नयेत, सबकुछ स्टेट फॉरवर्ड असा अजेंडा आहे.
आ.चैनसुख संचेती यांनी प्रदेश कार्यालयातून नवनियुक्त अध्यक्षांची यादी मंगळवारी जाहीर केली. सोलापूर शहर सरचिटणीस माजी नगरसेविका रोहिणी तडवळकर यांची अध्यक्षपदी निवड अनपेक्षित मानली जाते. कारण अन्य इच्छुकांनी लाॅबिन्ग करण्याचा प्रयत्न केला होता. मंगळवेढ्याचे शशिकांत चव्हाण यांना ग्रामीण जिल्हाअध्यक्ष म्हणून संधी दिली आहे. गतवेळी नाना चव्हाण दावेदार होते. पण तेव्हा आ.कल्याणशेट्टींच्या गळ्यात माळ पडली. नरेंद्र काळे, आ.कल्याणशेट्टी यांना पुन्हा संधी मिळेल, अशी चर्चा होती. आगामी निवडणुका पाहता उभयतांची तयारीदेखील होती. पण श्रेष्ठींनी धक्कातंत्र अवलंबला. सोलापुरात प्रथमच महिला अध्यक्षांची निवड हा त्यापैकीच एक धक्का आहे. सोलापुरात तीन आमदार भाजपाचे आहेत, त्यांच्यात समन्वय हेतूनेच हा बदल झाला, असे प्रथम दर्शनी दिसते.
तडवळकराना नगरसेविका तसेच संघटनात्मक कामाचा दांडगा अनुभव आहे. तसेच विरोधी पक्षनेते पद ही भूषविले आहे. पण त्यांच्या नंतर पक्षात आलेल्या अन्य महिलांना संधी मिळाली त्यावेळी तडवळकर यांना डावलेले गेले. 1992 मध्ये सर्वप्रथम नगरसेविका झाल्या. त्यानंतर 2002, 2007, 2012 या काळात पुन्हा संधी मिळाली. अभाविपच्या माध्यमातून त्यांचे सामाजिक कार्य, पुढे भाजपा, सहकार पतपेढी स्थापना, शैक्षणिक, स्त्री जागरण या क्षेत्रात तडवळकर यांचे उल्लेखनीय काम आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठात सिनेट सदस्या आहेत. त्यांचे पती रामभाऊ तडवळकर यांचेही संघ परिवार भाजपात मोठे योगदान आहे.
मंगळवेढ्याचे शशिकांत चव्हाण गत दोन टर्मपासून सरचिटणीस आहेत. संघटनात्मक कामात हातखंडा आहे. गतवेळी डावलेली संधी आता मिळाली आहे. सौ.तडवळकर व श्री.चव्हाण आणि सांगोलेचे केदार सावंत यांना लक्ष्यवेध न्यूज तर्फे शुभेच्छा.....
What's Your Reaction?






