ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यात विहिंपचा शस्त्रपूजन सोहळा
विजयादशमी निमित्त शौर्य, पराक्रम, इतिहासाचा जागर, दुर्गा वाहिनी, मातृशक्ती, बजरंग दलाची प्रमुख उपस्थिती
सोलापूर : भारतीय संस्कृती, सनातनी परंपरा आणि पराक्रम, शौर्याच्या गौरवशाली इतिहासाचा जागर करणारा विश्व हिंदू परिषदेचा आगळा वेगळा दुर्गा शक्ती जागरण उत्सव रविवारी सोलापूरच्या ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यात रविवारी पार पडला.
विहिंपच्या वतीने दसर्यानिमित्त दुर्गा व शस्त्रपूजनास दुर्गा वाहिनी,मातृशक्ती व बजरंग दलाचे कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.
तिथीनुसार इतिहासाचे स्मरण करण्याचे महत्त्व अभ्यासक श्री मारुती सुरवसे यांनी सांगितले. नवरात्र आणि सनातन धर्मातील तिथी, संस्कृती, सण,उत्सव, धार्मिक परंपरा यांना विशेष महत्त्व असून, त्यामागील सांस्कृतिक आणि ऐतिहासिक संदर्भ समजून घेणे आवश्यक आहे. ऐतिहासिक घटनांचे स्मरण, परंपरा, पराक्रम, शौर्य पुढील पिढीपर्यंत पोहोचविणे आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
भुईकोट किल्ल्याचा इतिहास आणि मध्ययुगीन शस्त्रास्त्रांचे महत्त्व याविषयी भुईकोट किल्ल्याचे अभ्यासक श्री. योगीनाथ फुलारी यांनी उजाळा दिला. भुईकोट किल्ल्याची पार्श्वभूमी, त्याचे ऐतिहासिक आणि सामरिक महत्त्व नमूद करताना किल्ले हे आपल्या पराक्रमाचे साक्षीदार असून, त्यांच्याशी संबंधित इतिहास तसेच शस्त्र आणि शास्त्र देखील समजून घेणे हे नव्या पिढीसाठी आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले.
विजयादशमी निमित्त ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यात विहिंपच्या आगळ्या वेगळ्या दुर्गा व शस्त्रपूजन उत्सवासप्रांत अध्यक्ष प्रा. गजानन धरणे, जिल्हा अध्यक्ष विष्णुपंत मोंढे पाटील, धर्मप्रसार प्रांत सहप्रमुख मुकेश दायमा (इचलकरंजी), विहिंप विभागमंत्री विजयकुमार पिसे, सहमंत्री संजयकुमार जमादार, जिल्हा मंत्री जयदेव सुरवसे, विष्णू जगताप, बाबू गिरगाल, बजरंग दल प्रमुख अभय कुलथे, मातृशक्ती प्रमुख माधुरी एकबोटे, दुर्गा वाहिनी प्रमुख ऐश्वर्या सारोळकर, उद्योजिका वैैशाली एकबोटे, राजू हिबारे, सचिन जाधव तसेच अक्कलकोट, दक्षिण सोलापूर व उत्तर सोलापूऱ भागातून नागरिक व कार्यकर्ते उपस्थित होते.
भुईकोट किल्ल्यातील कपिलसिध्द मंदिरात आयोजित कार्यक्रमातून सोलापूरचा ऐतिहासिक वारसा,पराक्रम, शौर्याचे महत्त्व अधोरेखित झाले. तसेच दुर्गा शक्ती जागरण उत्सवातून शक्ती, भक्ती, संस्कृती आणि इतिहास यांच्या समन्वयातून सांस्कृतिक परंपरांचे संवर्धन करण्याचा संदेश देत संपूर्ण वंदेमातरमने उत्सवाची सांगता झाली.
(वृत्त संकलन : अजय गवसने, प्रखंड सहमंत्री)
What's Your Reaction?