श्री महात्मा बसवेश्वर प्रतिष्ठानतर्फे नारीशक्ती पुरस्काराने गौरव
महिलांच्या उल्लेखनीय कार्याची दखल; प्रतिष्ठानचा अभिनव उपक्रम
सोलापूर : जगतज्योती महात्मा बसवेश्वर जयंतीचे औचित्य साधून श्री महात्मा बसवेश्वर प्रतिष्ठान जुळे सोलापूरच्या वतीने समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणार्या महिलांना प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्रीशैल हत्तुरे मामा यांच्या हस्ते नारी शक्ती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
या सन्मान सोहळ्यात सरोजिनी टिपे, मीनल दास, डॉ.वैशाली मैंदर्गी, शिक्षिका रूपाली येळमेली, माजी सभापती विद्या शिंदे, प्रांजली मोहेकर, कल्पना भोसले, आरती कुसेकर आणि अरुंधती हराळकर यांना त्यांच्या कार्याचा सन्मान म्हणून नारीशक्ती पुरस्कार प्रदान करण्यात आला.या कार्यक्रमाला प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्रीशैल हत्तुरे, उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर आणि मंजुषा दोडकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
विश्व हिंदू परिषदेचे उपाध्यक्ष अॅड. केदार पाटील, जिल्हा मंत्री जयदेव सुरवसे, चंद्रकांत कुलकर्णी, शाम कदम, सुरेखा पडसलगी, संभाजी भोसले, उत्सव अध्यक्ष महेश इचगे, उपाध्यक्ष राहुल उपासे, सचिव शिवराय आलूरे, कोषाध्यक्ष लिंगराज ख्याड, कार्याध्यक्ष सिद्धाराम येणेगुरे, परमेश्वर माळगे, सचिन कोटाणे अजिंक्य उप्पीन यांच्यासह प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.
What's Your Reaction?