महापौर निवास समोर विचित्र अपघात,लहान मुलीचे दात पडले, हिरड्यात दोन दात अडकले
पावसाने वाहून आलेली वाळू, डस्ट; शहरात अनेक ठिकाणे धोकादायक
सोलापूर | पंधरवडय़ापूर्वी सततच्या अतिवृष्टीमुळे पाण्याचे प्रचंड लोंढे रस्त्यावरून वाहात होते. गुरुवारी रात्री आठच्या सुमारास महापौर निवाससमोर एक विचित्र अपघात झाला. यामध्ये 8 वर्षाच्या मुलीचे तीन दात पडले. आणि आणखी दोन दात तिच्या हिरड्यात अडकले.
रात्री 9 च्या सुमारास मामासोबत दुचाकीवरून ती ट्युशनहुन घरी परतत होती. तेव्हा अचानकपणे दुचाकी घसरली. वाळूच्या डस्टमुळे अपघात झाला, या अपघातात लहान मुलीला गंभीर दुखापत झाली. मनस्वी विशाल शिंगे (रा. पाथरूट चौक) असे तिचे नाव आहे. तिला गंभीर दुखापत झाली असून मार्कंडेय रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू आहेत.
या अपघातात तिचे तीन दात पडले तसेच दोन दात हिरड्यांमध्ये अडकले आहेत. मनस्वीचे मामा रणधीर बनपट्टे ट्युशन संपल्यानंतर तिला दुचाकीवरून आणत होते. महापौर बंगल्याच्या वळणावर एक गाडी अचानक समोरून आली. दुचाकी नियंत्रणात आणताना रस्त्यावरील वाळूमुळे गाडी स्लिप झाली. अपघातामध्ये मनस्वी शिंगे हिला गंभीर दुखापत झाली. तिचे तीन दात रस्त्यावरच पडले. शिवाय हिरड्यात दोन दात अडकले. अपघातामुळे घटनास्थळी रक्त पडले होते.
महापालिकेच्या दुर्लक्षामुळे शहरात अनेक ठिकाणी रस्त्यांवर वाळू डस्ट पसरली आहे. यामुळे अपघातांच्या घटना घडत आहेत याकडे महापालिका प्रशासनाने कधी लक्ष देण्याची गरज आहे. याबद्दल तीव्र संताप नागरिकांतून व्यक्त होत आहे.
What's Your Reaction?